You are currently viewing आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून कुडाळ – मालवण तालुक्यातील प्राथमिक शाळा व माध्यमिक विद्यालयांना होणार थर्मल गन व ऑक्सिमीटरचे वितरण

आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून कुडाळ – मालवण तालुक्यातील प्राथमिक शाळा व माध्यमिक विद्यालयांना होणार थर्मल गन व ऑक्सिमीटरचे वितरण

कुडाळ

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना आजाराचा प्रादुर्भाव आता कमी होत आहे. शाळा, विद्यालये कोरोना आजाराचे नियम व अटी तसेच आवश्यक काळजी घेऊन सुरु करण्यात येत आहेत. याप्रसंगी शाळा, विद्यालयांच्या प्रवेशद्वारावर शिक्षक, विद्यार्थी तसेच शाळेत भेट देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी करून आत सोडले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम व हि तपासणी सुलभ व्हावी या उद्देशाने आमदार वैभव नाईक यांच्या आमदार निधीतून कुडाळ-मालवण मतदार संघात प्रत्येक प्राथमिक व माध्यमिक शाळा, विद्यालयांना थर्मल गन व ऑक्सिमीटरचे वितरण करण्यात येणार आहे.
शनिवार दि. १६/०१/२०२१ रोजी सकाळी ११ वाजता, मामा वरेरकर नाट्यगृह, मालवण येथे मालवण तालुक्यातील सर्व प्राथमिक शाळा व माध्यमिक विद्यालये यांना थर्मल गन व ऑक्सिमीटरचे वाटप करण्यात येणार आहे. तर सोमवार दि. १८/०१/२०२१ रोजी सकाळी १० वाजता पंचायत समिती सभागृह कुडाळ येथे कुडाळ तालुक्यातील सर्व प्राथमिक शाळा व माध्यमिक विद्यालयाना थर्मल गन व ऑक्सिमीटरचे वाटप करण्यात येणार आहे. तरी त्या त्या तालुक्यातील सर्व प्राथमिक शाळा, माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापक/शिक्षक, किंवा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांनी वरील दिलेल्या ठिकाणी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन तालुकाप्रमुख श्री राजन नाईक व श्री हरी खोबरेकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

6 + ten =