You are currently viewing कायदेविषयक ज्ञानाचा आणि माहितीचा उपयोग मुलींनी वास्तव जीवनात करावा – राणीसाहेब शुभदादेवी भोसले

कायदेविषयक ज्ञानाचा आणि माहितीचा उपयोग मुलींनी वास्तव जीवनात करावा – राणीसाहेब शुभदादेवी भोसले

एस. पी.के. महाविद्यालयात महिला दिन साजरा…

सावंतवाडी

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन आजच्या काळात कोणत्याही परिस्थितीत मुली खंबीरपणे त्या परिस्थितीला तोंड दिलं पाहिजे. दुबळेपणाच्या भावना मनातून काढून टाकली पाहिजे आणि स्वत:चे मनोधैर्य वाढवले पाहिजे तरच परिस्थितीवर आपण मात करू शकतो कायदेविषयक ज्ञानाचा , माहितीचा उपयोग वास्तवामध्ये केला पाहिजे. अन्यायाविरूध्द ठामपणे आवाज उठवला तरच समाजात आपण ताठ मानेने जगू शकतो स्वसंरक्षणासाठी सज्ज व्हा असे प्रतिपादन कार्यक्रमाच्या अध्यक्ष संस्थेच्या कार्याध्यक्षा श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोसले यांनी महिला दिन कार्यक्रम प्रसंगी केली

श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी अॅड . सौ भाग्यश्री भोसले, अॅड अश्विनी लेले, लॉ कॉलेज प्राचार्या, महिला विकास कक्षाच्या समन्वयक प्रा. नीलम धुरी व विकास कक्षाच्या सर्व सदस्या तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख अतिथी श्रीमंत राणीसाहेब .शुभदादेवी खेमसावंत भोसले यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. नीलम धुरी यांनी केले स्त्रिया व मुली यांना सर्वच ठिकाणी नेहमीच सुरक्षित वाटेल असे वातावरण निर्माण करण्याची गरज आहे मुलींनी जागरूक होऊन साचेबद्ध भूमिका बदलण्यासाठी सक्षम होण्याची तेवढीच गरज आहे.

यासाठी महाविद्यालयीन महिला कक्षाच्या वतीने अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते असे सौ धुरी प्रस्थाविकात म्हणाल्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या अॅड भाग्याश्री भोसले यांनी याप्रसंगी मार्गदर्शन केले यावेळी त्या म्हटल्या की समाजात वावरताना मुली तसेच सर्वच महिलांना अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागते त्यासाठी शासनाने संविधानाच्या माध्यमातून अनेक संरक्षणविषयक कायदे केले आहेत. परिस्थितीनुसार त्यांचा वापर केला पाहिजे. न्यायालयाकडे दाद मागितली पाहिजे मुलीनी स्वत:चे संरक्षण करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी कायद्याची माहिती असणे आवश्यक आहे समाजातील घातक प्रवृत्तीना न घाबरता वाईट प्रवृत्तींचा नाश करण्यासाठी सज्ज झालं पाहिजे मुलींनी दुबळेपणा झटकून टाकून स्वत:ला सामर्थ्यशाली बनवलं पाहिजे

प्रतिक्रिया व्यक्त करा