लायन्स क्लब आणि सेवाभावी मंडल यांचा सावंतवाडी शहरात स्तुत्य उपक्रम

लायन्स क्लब आणि सेवाभावी मंडल यांचा सावंतवाडी शहरात स्तुत्य उपक्रम

कॉटेज परिसरात केले निर्जंतुकीकरण

सावंतवाडी

लायन्स क्लब ऑफ सावंतवाडी आणि सेवाभावी मंडल सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आज रविवा कॉटेज हॉस्पिटल सावंतवाडी, राणी जानकीबाई सुतिकाग्रह सावंतवाडी तसेच भाई साहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालय सावंतवाडी येथे निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली आहे. यावेळी लायन्स अध्यक्ष ला. अशोक देसाई, सचिव ला. अँड. परिमल नाईक, खजिनदार ला. प्रेमानंद देसाई, ला. बाळ बोर्डेकर, ला. संदेश परब, ला. रवी सावंत, ला. विद्याधर तावडे, ला. बळवंत कुडतरकर, ला. डॉ. गौरव जाधव, ला. ला. अरविंद पोकर, ला. परब, ला. रवींद्र स्वार, तसेच सेवाभावी मंडलचे संजू विर्नोडकर, संतोष तळवणेकर, तुषार बांदेकर, आकाश मराठे,  दीपक केदार, शुभम केदार, सौ. परिनीती वर्तक, सौ.सुकन्या टोपले, सौ. संगीता गावडे, सौ संगीता परब आदी कार्यकर्ते उपस्थित होते. सदर उपक्रमाबद्दल हास्पिटल प्रशासन व आयुर्वेद कॉलेज संस्था संचालक यांनी आभार व समाधान व्यक्त केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा