You are currently viewing सैनिक स्कूलच्या तीन विद्यार्थ्यांची SSB साठी निवड

सैनिक स्कूलच्या तीन विद्यार्थ्यांची SSB साठी निवड

आंबोली

येथील सिंधुदुर्ग सैनिक स्कूलच्या तीन विद्यार्थ्याची भारतीय सैन्य दलात “एस.एस.बी” साठी निवड झाली आहे. यात कॅडेट तन्मय शशिकांत राणे , कॅडेट उत्कर्ष महेश मगदूम, कॅडेट सन्मेश सुदर्शन अळकुटे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष पी.एफ. डान्टस आणि शिक्षकांकडून या यशस्वी विद्याथ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट एक्स सर्व्हिसमेन असोसिएशन, सिंधुदुर्ग संचलित सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली ही नामांकित शाळा सलग 19 वर्षे शिस्तप्रिय, सक्षम, साहसी विद्यार्थी घडविण्याचे अविरत कार्य करत आहे. या यशात अजून भर घालत स्कूलच्या तीन यशस्वी विद्यार्थ्याची बारावी नंतरच्या 10+2 technical entry च्या (SSB) मुलाखती साठी निवड झाली आहे. सैनिक स्कूल मध्ये असताना संपादित केलेल्या ज्ञानाच्या आधारे आणि सैन्य दलात उच्च पदस्थ अधिकारी बनण्याचे ध्येय घेवून ज्ञानार्जन करणारे सैनिक स्कूलचे विदयार्थी इयत्ता १२वी नंतर ही आपल्या ध्येयासाठी प्रयत्नशील राहतात. भारत सरकारचा रक्षा मंत्रालया मार्फत सेवा निवड समिती (SSB) दवारे देशभरातून उच्च पदस्थ अधिकारी निवड करण्यासाठी मुलाखत घेतली जाते. हे विदयार्थी थेट SSB साठी निवडले जातात. यामध्ये सैनिक स्कूलच्या तीन विद्यार्थ्यांनी यश संपादन करून स्कूलच्या यशात आणखीन भर घातली आहे.
आत्तापर्यंत प्रशालेचे १४ विद्यार्थी NDA लेखी परीक्षा उत्तीर्ण झाले असून २० विद्यार्थी SSB साठी पात्र ठरले आहेत . एकूण १९ विद्यार्थी भारतीय सैन्यात वेग वेगळ्या पदावर देशसेवा बजावत आहेत .
या यशस्वी विदयार्थ्याचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष श्री. पी. एफ. डान्टस , सचिव सुनिल राऊळ, शाळेचे प्राचार्य. एस. टी. गावडे, सर्व संचालक व सर्व शिक्षकांकडून केले जात आहे. तसेच SSB साठी शुभेच्छा दिल्या. या यशस्वी विद्यार्थ्याना ज्युनिअर कॉलेजच्या सर्व शिक्षकांकडून मार्गदर्शन लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

6 − two =