You are currently viewing आजरा येथील खदरू सावंतवाडी तालुक्यातून गुरे नेतो कत्तलखान्यात

आजरा येथील खदरू सावंतवाडी तालुक्यातून गुरे नेतो कत्तलखान्यात

वाकलो नावाचा स्थानिक व्यक्ती करतो एजंटगीरी

सावंतवाडी तालुक्यातील काही गावांमधून आजरा येथून येणारा खदरू(नाव बदल) नामक मुस्लिम व्यक्ती पाळीव जनावरे विकत घेतो. वाकलो(नाव बदल) नावाचा स्थानिक व्यक्ती एजंट म्हणून गावातील लोकांना भेटून त्यांच्याकडे गाई, बैल यांचा सौदा ठरवतो. एजंट वाकलो ने सौदा ठरवल्यानंतर खदरू येऊन गावातील गुरे कत्तलखान्यात घेऊन जातो.
आज देखील न्हावेली येथे खदरू गुरे पाहण्यासाठी आलेला आहे. सोनूर्ली पाक्याचीवाडी येथील वाकलो त्याला आजूबाजूच्या गावातील गुरांचा सौदा ठरवून देतो.
एकीकडे पाळण्यासाठी गुरे टेम्पोतून आणताना अनेक अडचणी येतात, पाळण्यासाठी गाई वाहतूक करताना गो रक्षक म्हणून काम करणाऱ्या काही संघटना वाहतूक रोखतात, चौकशा करतात. परंतु दुसऱ्या राज्यातील एक गुरांना कत्तलखान्यात नेऊन कत्तल करणारी व्यक्ती सावंतवाडीत गावागावात फिरून पाळीव जनावरे खुलेआम कत्तलखान्यात पोचवतो परंतु त्याची साधी चौकशी होत नाही किंवा कोणतीही कारवाई होत नाही याचे आश्चर्य वाटत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × two =