You are currently viewing येत्या वर्षातील कणकवली पर्यटन महोत्सव कोरोनामुळे रद्द

येत्या वर्षातील कणकवली पर्यटन महोत्सव कोरोनामुळे रद्द

कणकवली नगरपंचायत मार्फत गेली दोन वर्ष सातत्यपूर्ण पर्यटन महोत्सव करण्यात येत होता. या पर्यटन महोत्सवाच्या माध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल होत असतानाच कणकवली करांचे मनोरंजनही होते. अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांची मांदियाळी या पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने कणकवलीकरांना अनुभवता येत होती. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच जानेवारीमध्ये घेण्यात येत असलेला कणकवली पर्यटन महोत्सव 2021 मात्र कोरोनाच्या संकटामुळे रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. कणकवलीकरांसाठी राबवीत असलेला हा उपक्रम येत्या वर्षी खंडित होत असल्याबद्दल श्री नलावडे यांनी कणकवलीरांकडे दिलगिरीही व्यक्त केली आहे. मात्र कोरोनाचे संकट संपल्यानंतर 2022 मध्ये कणकवली पर्यटन महोत्सव पुन्हा एकदा दिमाखाने व भव्यदिव्य स्वरूपात साजरा करण्यात येईल असेही श्री नलावडे यांनी सांगितले. कणकवली पर्यटन महोत्सवात गेल्या दोन वर्षात खाद्यसंस्कृती बरोबरच, नामवंत कलाकारांची मांदियाळी कणकवलीकरांना याची देही याची डोळा अनुभवता आली होती. अनेक स्थानिक कलाकारांनाही या पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने व्यासपीठ उपलब्ध झाल्याने त्यांच्या कलागुणांना संधी मिळाली होती. पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात स्टॉल च्या माध्यमातुन आर्थिक उलाढालही होत होती. यामुळे बचत गटांसह अनेक स्थानिकांना रोजगाराची ही संधी निर्माण झाली होती. मात्र यावर्षीची कोरोनाचे संकट असल्यामुळे पर्यटन महोत्सवाला शासनाकडून परवानगी मिळण्याची शक्यता नाही. त्यातच पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाच्या संसर्गाचा धोका वाढू शकतो. या साऱ्या पार्श्वभूमीवर 2021 मधला कणकवली पर्यटन महोत्सव रद्द करून त्या पुढील वर्षात दिमाखदार पणे साजरा करण्यात येईल. कणकवलीकरांनी आतापर्यंत जसे सहकार्य केले अशीच साथ द्यावी असे आवाहन श्री नलावडे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty + 6 =