You are currently viewing कुडाळमध्ये १८ जुलैला लायन्स क्लबचा पदग्रहण सोहळा
Oplus_16908288

कुडाळमध्ये १८ जुलैला लायन्स क्लबचा पदग्रहण सोहळा

गुणवंतांचा होणार सन्मान

कुडाळ :

लायन्स क्लब ऑफ कुडाळ, सिंधुदुर्ग चा पदग्रहण सोहळा १८ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता कुडाळ येथील महालक्ष्मी सभागृहात लायन एमजेएफ सर्जेराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे. २०२६ – २७ या वर्षासाठी लायन्स नूतन अध्यक्षा – स्नेहा नाईक, सचिव – स्नेहांकिता उर्फ शोभा माने, खजिनदार- अस्मिता बांदेकर यांच्यासह सर्व पदाधिकारी पदग्रहण स्वीकारणार आहेत.

या सोहळ्याच्या निमित्ताने लायन्स क्लब परिवारातील विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थी आणि विविध क्षेत्रात नावलौकिक मिळविलेल्या लायन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. तसेच सामाजिक उपक्रमांतर्गत गरजूंना मदत आदी उपक्रम राबविण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा