You are currently viewing सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात धारदार शस्त्राने गळा कापलेल्या अज्ञात रुग्णाचा मृत्यू

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात धारदार शस्त्राने गळा कापलेल्या अज्ञात रुग्णाचा मृत्यू

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात धारदार शस्त्राने गळा कापलेल्या अज्ञात रुग्णाचा मृत्यू

उपचारादरम्यान मृत्यू; अपर पोलीस अधीक्षकांसह पथक रुग्णालयात दाखल, चौकशीसाठी एका कर्मचाऱ्याला ताब्यात घेतल्याची माहिती

सावंतवाडी : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात गुरुवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास गळ्यावर धारदार शस्त्राने वार झालेल्या एका अज्ञात रुग्णाला उपचारासाठी आणण्यात आले होते. डॉक्टरांनी उपचार केले; मात्र या रुग्णाचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक आणि त्यांचे पोलीस पथक सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले. या प्रकरणाच्या अनुषंगाने रुग्णासोबत आलेल्या बिहारी कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात येत असून, एका कर्मचाऱ्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. मृत व्यक्तीची ओळख आणि घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
घटनेच्या वेळी रुग्णालयात डॉक्टर अनिकेत गुरव, डॉक्टर मयूर सुळे-बावकर, डॉक्टर फातिमा फेमिन, परिचारिका केरकर, इतर आरोग्य कर्मचारी तसेच जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर उपस्थित होते.
या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस पथकाकडून सुरू आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा