*पीडित वीज ग्राहक, सरपंच, लोकप्रतिनिधींना उपस्थित राहण्याचे आवाहन*
सावंतवाडी:
सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना, सिंधुदुर्गची तातडीची सभा आज दिनांक 13/7/2026 रोजी शासकीय विश्रामगृह, सावंतवाडी येथे दुपारी 3 वाजता आयोजित करण्यात आलेली आहे.
आजच्या सभेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चार लाख 4 हजार एकूण वीज ग्राहकांपैकी एक लाखापेक्षा जास्त वीज ग्राहकांना जबरदस्तीने लावण्यात आलेले वीज मीटर याबाबत सखोल चर्चा करण्यात येणार आहे.
सदरील स्मार्ट मीटर लावल्यानंतर अनेक वीज ग्राहकांना अवाजवी वाढीव बिले आल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष वाढला आहे.
याबाबत सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेकडे अनेक लेखी तोंडी तक्रारी आलेल्या असून या संदर्भात पुढील दिशा ठरवण्यासाठी आजच्या निर्णायक बैठकीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पीडित वीज ग्राहक, सर्व सन्माननीय सरपंच तसेच सर्व लोकप्रतिनिधी यांनी लेखी तक्रारीसह उपस्थित रहावे असे आवाहन श्री संजय लाड, अध्यक्ष व श्री साईनाथ आंबेरकर, सचिव सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना यांनी केले आहे.
