भटवाडी, बाहेरचावाडा परिसरातील विजेची समस्या सोडवा – दिपाली भालेकर

भटवाडी, बाहेरचावाडा परिसरातील विजेची समस्या सोडवा – दिपाली भालेकर

वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे निवेदनाव्दारे मागणी

सावंतवाडी

भटवाडी व बाहेरचावाडा परिसरातील गेले २ महिने रस्त्यावरील लाईट व घरातील लाईट वारंवार जात आहेत.याचा येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी मेन लाईनवरील झाडी तोडा, तसेच विज लाईनवरील वरील योग्य ती दुरुस्ती पावसाळ्यापूर्वी करून घ्या,अशी मागणी नगरसेवक दिपाली भालेकर यांनी वीज वितरण उपकार्यकारी अभियंता श्री भुरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, दिवसातून दहा ते पंधरा वेळा लाईट गेल्यामुळे येथील नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित विभागाकडे वेळोवेळी तक्रार करून सुद्धा तात्पुरत्या दुरुस्त केल्या जातात. त्यामुळे आता पावसाळ्यापूर्वी योग्य ती कार्यवाही करा,अशीही मागणी त्यांनी केली आहे.
यावेळी हे निवेदन नगरसेविका दिपाली दिलीप भालेकर यांच्या नेतृत्वाखाली वीज वितरण उपकार्यकारी अभियंता श्री भुरे यांना देण्यात आले.यावेळी सामाजिक कार्यकर्ते दिलीप भालेकर, जहूर शेख, सचिन साटेलकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा