You are currently viewing परम पूज्य विनायक अण्णा राऊळ महाराज महाविद्यालय, साळगावच्या एनएसएस स्वयंसेवकांचा अनुभवात्मक शिक्षण कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग

परम पूज्य विनायक अण्णा राऊळ महाराज महाविद्यालय, साळगावच्या एनएसएस स्वयंसेवकांचा अनुभवात्मक शिक्षण कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग

परम पूज्य विनायक अण्णा राऊळ महाराज महाविद्यालय, साळगावच्या एनएसएस स्वयंसेवकांचा अनुभवात्मक शिक्षण कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग…

📍कुडाळ

परम पूज्य विनायक अण्णा राऊळ महाराज महाविद्यालय, साळगाव येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या स्वयंसेवकांनी मेरा युवा भारत सिंधुदुर्ग व प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्र, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अनुभवात्मक शिक्षण कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत समाजाभिमुख शिक्षणाचा आदर्श घालून दिला.
कुडाळ येथील जय गणेश स्वस्त औषधी सेवा केंद्रात आयोजित या उपक्रमाचे नेतृत्व मेरा युवा भारत सिंधुदुर्गचे जिल्हा युवा अधिकारी श्री. सम्राट पाटील यांनी केले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजनेचे उद्दिष्ट, दर्जेदार व परवडणारी औषधे, औषध वितरण व्यवस्था, तसेच आरोग्यविषयक विविध योजनांची प्रत्यक्ष माहिती देण्यात आली. या अनुभवात्मक उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आरोग्यसेवा व्यवस्थेची जवळून ओळख होण्याची संधी मिळाली.
महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. सचिन पाटकर यांच्या प्रेरणेतून आणि एनएसएस विभाग प्रमुख प्रा. नितीन ढेकळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसेवकांनी कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला. तसेच मेरा युवा भारत सिंधुदुर्गचे सहदेव पाटकर आणि जय गणेश स्वस्त औषधी सेवा केंद्र यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
या उपक्रमात एनएसएस छात्र अध्यापक कु. रसिका पाटील तसेच स्वयंसेवक प्रणव कुडाळकर, पार्थ मांजरेकर, गोविंद जाधव, निखिल मालवणकर आणि ऋतुराज जाधव यांनी उत्साहाने सहभाग घेत कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात मोलाचे योगदान दिले.
अनुभवाधारित शिक्षणातून विद्यार्थ्यांमध्ये सेवाभाव, सामाजिक उत्तरदायित्व, नेतृत्वगुण आणि आरोग्याविषयी जनजागृती निर्माण करण्याचा उद्देश या उपक्रमातून सफल झाला. उपस्थित मान्यवरांनी स्वयंसेवकांचे कौतुक करून त्यांच्या समाजाभिमुख कार्याची प्रशंसा केली.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांद्वारे शिक्षणासोबत सामाजिक बांधिलकीची जाणीव रुजविण्याचा महाविद्यालयाचा प्रयत्न भविष्यातही सातत्याने सुरू राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा