You are currently viewing प्राथमिक व माध्यमिक शाळांचे निकाल जाहीर

प्राथमिक व माध्यमिक शाळांचे निकाल जाहीर

नवीन शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून

*बांदा*

प्राथमिक ज्व माध्यमिक शाळांचे निकाल यंदा १मे ऐवजी ६मे रोजी जाहीर केले. निकाल हाती पडल्यानंतर विद्यार्थी व पालकांचा आनंद‌ द्विगुणीत झाला. यंदा नवीन शैक्षणिक वर्ष १५जूनपासून सुरू होणार आहे. यावेळी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी शिक्षकांना नमस्कार करीत आशिर्वाद घेतले.
शनिवारी सकाळी सर्वच शाळांमध्ये विद्यार्थ्यांसह पालकांची निकाल पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.वर्गशिक्षकांनी हजेरीनुसार प्रत्येक विद्यार्थ्यांचा निकाल विद्यार्थी व पालकांकडे दिला. तसेच पुढील प्रवेशासंदर्भात सूचना दिल्या. शाळेतर्फे वर्गशिक्षकांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × four =