You are currently viewing कासार्डे वरिष्ठ महाविद्यालयचा १०० टक्के निकाल

कासार्डे वरिष्ठ महाविद्यालयचा १०० टक्के निकाल

विश्वजीत पाताडे महाविद्यालयात अव्वल

तळेरे

मुंबई विद्यापीठ अंतर्गत झालेल्या परीक्षेत कणकवली तालुक्यातील कासार्डे विकास मंडळ संचलित, कासार्डे वरिष्ठ महाविद्यालय तृतीय वर्ष वाणिज्यचा निकाल १०० टक्के लागला असून विश्वजीत अनिल पाताडे याने 86 टक्के गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे.
१०० टक्के निकालाने महाविद्यालयाने आपली यशाची परंपरा कायम ठेवली आहे.कासार्डे वरिष्ठ महाविद्यालय वाणिज्य तृतीय वर्षात गुणानुक्रमे गूणवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे-
विश्वजीत अनिल पाताडे 86 टक्के -प्रथम,तर कु.अस्मिता अरुण राणे, कु.प्रियांका गुणाजी जाधव, अक्षय विलास शेट्ये व अमोल प्रभाकर शिंदे यांनी 85 टक्के गुणासह विभागून- द्वितिय क्रमांक तर मिलिंद विनोद बंदरकर याने ८४ टक्के गुणासह तृतीय क्रमांक मिळवला आहे.तृतीय वर्षातील बहुतांश विद्यार्थ्यांना ‘o’ ही सर्वोच्च ग्रेड मिळाली असून काही विद्यार्थी ‘A+’ मधील श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
याच बरोबर व्दितीय वर्षात-
कु.गौरी चंद्रमोहन मणचेकर -प्रथम, रोहित दिपक पावरा -द्वितीय व कु. राखी दिपक शिर्सेकर -तृतीय आली आहेत.
तसेच वाणिज्य प्रथम वर्षात-कु तेजश्री संजय पाताडे-पाटील-प्रथम,
कु.आरती जयप्रकाश बंड- द्वितीय तर कु.पल्लवी प्रभाकर गायकवाड- तृतीय आली आहे.
या गुणवंत विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य एम.डी.खाड्ये, उपप्राचार्य प्रा.एस.एस.डिगसकर, प्राध्यापिका श्रीम.पी.एन. पारकर, प्राध्यापक एस.व्ही. गावडे, शिक्षकेतर कर्मचारी सत्यवान तावडे,दिपेंद्र सुतार यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे कासार्डे विकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष परशुराम माईणकर, मानद सरचिटणीस उपेंद्र पाताडे स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष प्रभाकर कुडतरकर, स्कूल कमिटी चेअरमन मधुकर खाडये, विद्यालयाचे प्राचार्य आर.व्ही. नारकर तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 5 =