You are currently viewing एसटीने मुंबई रिटर्न कर्मचारी सोडले वाऱ्यावर!

एसटीने मुंबई रिटर्न कर्मचारी सोडले वाऱ्यावर!

मुंबईतून आलेले कर्मचारी गेले ड्युटीवर, त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह; जमवा – जमव करताना डेपो मॅनेजरची धावाा धाव 

सिंधुदूर्ग

जिल्ह्यातील एसटी महामंडळाचे चालक आणि वाहक यांना मुंबईला ड्युटीवर पाठविले जाते. पंधरा दिवसानंतर मुंबईतून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या चालक वाहकांना त्यांचे कोरोना चाचणी अहवाल प्राप्त होण्या पूर्वीच त्यांना जिल्ह्यातील विविध एसटी मार्गावर ड्युटीवर पाठवण्याचे धक्कादायक प्रकार सुरू आहे. दोन दिवसां पूर्वीच मुंबईतून ड्युटीवर पाठविलेले चालक वाहक निघाले कोरोना पॉझिटिव्ह .यानंतर मुंबईतून आल्यानंतर तात्काळ चालक वाहकांना ड्युटीवर पाठविले होते.

कोरोना पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त होताच त्या संबंधित डेपो व्यवस्थापकंची तारांबळ उडाली. कोरोना पॉझिटिव्ह चालक वाहकांना रूटवरून जमवा जमव करावी लागली.एसटीच्या अधिकाऱ्याच्या बेफीकीर कारभारा बद्द्ल संताप व्यक्त करण्यात येत आहे. मुंबईतून ड्युटीवरून आलेल्या एसटी कर्मचारी यांना कोरोना पॉझिटिव्ह आल्यावर एसटी महामंडळाकडून कोणतीही मदत दिली जात नाही. तसेच एसटीचे अधिकारी साधी चौकशीही करत नसल्या बद्दल कर्मचारी वर्गातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. ज्या डेपो व्यवस्थापकानी कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झालेला नसताना देखील चालक वाहकांना ड्युटीवर पाठविले त्यांच्यावर विभाग नियंत्रक कोणती कारवाई करणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen − six =