You are currently viewing पावसाने दडी मारली

पावसाने दडी मारली

*सूरमयी साहित्य समूह सदस्य कवी जोतिबा पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*

*पावसाने दडी मारली…!*

काय राग तुझा रे पावसा
एक दिवस येऊन गेला,
बळीराजाच्या मनाला
कधी नाही का जाणला…!

उशीर तर खूपच म्हणा
हजेरी फक्त लावलास,
आस लावून अंतःकरणी
त्या वाटेने निघून गेलास…!

भेगा पडल्या काळ्या मातीत
डोळ्यांत चिंता दाटली,
पेरलेल्या त्या स्वप्नांवर
अनिश्चिततेची छाया पसरली…!

आभाळाकडे नजर लावून
तो अजूनही वाट पाहतो,
घामाच्या प्रत्येक थेंबातून
उद्याचं स्वप्न पेरत राहतो…!

ये आता सरींनी बरसून
धरतीची तहान भागव,
बळीराजाच्या कष्टांना
हिरव्या आशेचा श्वास दाखव…!

निसर्गाच्या या खेळामध्ये
धीरच त्याचा खरा आधार,
दडी मारू नको रे पावसा
तुझ्यावरच अवघ्या जगाचा भार…!

जोतिबा पाटील, किटवाड
ता. चंदगड जि. कोल्हापूर

_________________________
*संवाद मीडिया* 

*प्रवेश सुरू!! प्रवेश सुरू!!!*

*कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था मांडकी पालवण*

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाशी संलग्न आणि स्थापनेपासून *”अ”* दर्जा प्राप्त *महाविद्यालये*

*बारावी नंतर कृषी पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू….!!!*

1) *गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय मांडकी पालवण.*
*कॉलेज कोड:* *11165*

*👇अभ्यासक्रम*

▪️कृषी पदवी- BSc. (Hons.) Agriculture

प्रवेश क्षमता- 180

*संपर्क : 9421154594 9421230915 9405071319*

www.gncamp.org

2) *जिजामाता महिला कृषी महाविद्यालय मांडकी पालवण*.
*देशातील पहिले महिला कृषी महाविद्यालय*
*कॉलेज कोड:* *11311*

*👇अभ्यासक्रम.*

▪️कृषी पदवी- BSc. (Hons.)Agriculture

प्रवेश क्षमता- 60

*संपर्क : 8600879426 7588868705*

www.jwcagri.org

3) *डॉ.बुधाजीराव मुळीक कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय मांडकी पालवण*
*कॉलेज कोड:* *15196*

*👇अभ्यासक्रम.*

▪️कृषी अभियांत्रिकी पदवी-(Agricultural engineering)

प्रवेश क्षमता- 80

*संपर्क: 9421154594 7588868705*

www.dbmcaetmp.org

*टीप : इच्छुक विद्यार्थ्यांचे फॉर्म कॉलेजमध्ये भरून देण्यात येतील*

*प्रवेश प्रक्रियेविषयी अधिक माहितीसाठी आमच्या महाविद्यालयाचे व्हाट्सअप channel जॉईन करा*

https://whatsapp.com/channel/0029Vb2OWKRJENxsbWsAQ41a

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/207281/

https://www.facebook.com/share/p/1LPFm2kaQQ/
_________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा