*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*दिवा म्हणे मी..*
दिवा म्हणे मी करतो काय
उजळतो दाही दिशा
जगास देतो प्रकाश मजला
अंधाराची नशा..
माझ्याखाली अंधार पण
प्रकाश पुजितो मी
वाट दाखवून जगास देतो
यशाची ती हमी..
ताप तापतो जळून जाते
वात माझी सोबती
विझता विझता प्रकाश देणे
हीच आमुची सद्गती..
मा फलेषु कदाचन.. कृष्ण
सांगूनी गेले
कर्मगती ती प्रत्येकाची
त्यानुसार सारे चाले..
नियतकर्म ते नित्य करावे
सोडू नये हो मार्ग
प्रकाश देता इतरांना हो
मिळे आपणा स्वर्ग..
महान आहे पणती उजळे
हरएक अंगण
काम कधीही छोटे नसते
असे तिचे सांगणं..
कामामध्ये राम शोधते
पणती आम्हा सांगते
दिव्यादिव्यांनी अंगण सजते
लक्षुमी घरात येते…
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
