You are currently viewing बासरी

बासरी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी गीतकार संगीतकार गायक श्री अरुण गांगल लिखित अप्रतिम भक्ती रचना*

*”बासरी”*

कृष्ण सांगे बंसी ला आकृष्ट कर मन
चोरायाचे चित्त गोपिकांना भुलवून।।ध्रु।।

कुंजवनी पंचा हतरला भूवरी कृष्णानं
त्यावर ठेवली बासरी पाही कौतुकानं
बन्सीला सांगे केली तुझी सेवा प्रेमानं।।1।।

हाताचा दिधला बिछाना घेऊन करांत
आधाराची केली कुशी तुला अलगद
बोटांनी देत होतो तुझे अंग चेपून।।2।।

पावा वाजवितां हलवायचो केशसंभार
केसांनी घालायचो वारा अलवार
फुंकिता तुज मधुर स्वर येती बंसीतुन।।3।।

कुंजवनी मधुर वेणू वाजवी श्रीरंग
गवळणी आल्या ऐकून स्वर झाल्या दंग
विसरल्या संसार घरदार देहभान।।4।।

यमुने काठी रासक्रीडा चालू झाली वनांत
महादेव स्त्रीरूप घेऊन रमले खेळांत
ओळखले महेशां घेतले मिठीत कृष्णानं।।5।।

कृष्णांचे करांत मुरली चक्र सुदर्शन
द्वारकेचा राजा पण सुदामा मैत्री जपून
अर्जुनाचा सारथी राहे बहुरूपी बनून।।6।।

श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.
Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × three =