You are currently viewing पाय जपावा

पाय जपावा

*फार सुंदर पंचाक्षरी कविता*

*पाय जपावा*
*वळण्याआधी*

*तोल जपावा*
*ढळण्याआधी*

*अन्न जपावे*
*विटण्याआधी*

*नाते जपावे*
*तुटण्याआधी*

*शब्द जपावा*
*बोलण्याआधी*

*अर्थ जपावा*
*मांडण्याआधी*

*रंग जपावे*
*उडण्याआधी*

*मन जपावे*
*मोडण्याआधी*

*वार जपावा*
*जखमेआधी*

*अश्रू जपावे*
*हसण्याआधी*

*श्वास जपावा*
*पळण्याआधी*

*वस्त्र जपावे*
*मळण्याआधी*

*द्रव्य जपावे*
*सांडण्याआधी*

*हात जपावे*
*मागण्याआधी*

*भेद जपावा*
*खुलण्याआधी*

*राग जपावा*
*भांडणाआधी*

*मित्र जपावा*
*रुसण्याआधी*!!

*मैत्री जपावी*
*तुटण्या आधी*

*मस्त जगावे*
*मरण्या आधी!!*

( *सर्वांना पाठवा*
*विसरण्याआधी* )
🌹 🌹🌹
🙏🏾🙏🏾🙏🏾
*संग्रह #अजित नाडकर्णी संवाद मीडिया*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा