You are currently viewing गणपती बाप्पा

गणपती बाप्पा

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम भक्तीगीत*

 

*गणपती बाप्पा*

 

वाजतगाजत आली गणेशाची स्वारी

गणपती बाप्पा आले आमच्या घरी !!धृ!!

 

रांगोळी तोरण मांडला चौरंग

भक्तीच्या रंगात सानथोर दंग

उत्सव साजरा बाप्पांचा भारी!!१

 

चौसष्ट कला विद्येची देवता

सौम्य शांत रूप तेजस्वी खुलता

दुर्वांची जुडी वाहते शिरी!!२

 

जास्वंदमाला, आरास सुबक

आरती प्रसाद एकवीस मोदक

श्रध्देने भजता दु:ख जाई दूरी!!३

 

शरण तुला भक्त, संकटी तारतो

दैन्य दु:ख पीडा नित्य दूर करतो

नाम तुझे मुखी आशिष दे शिरी!!४

 

००००००००००००००००००००

 

*अरुणा दुद्दलवार@✍️*

प्रतिक्रिया व्यक्त करा