*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान, पुणे लेखक कवी वि.ग. सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*
*बकुळा*
〰️〰️〰️
अजुनही आठविते ती
ओंजळ बकुळफुलांची
अन नजर तुझी लाघवी
निर्मल त्या भावप्रितीची….
भावनांचा स्पर्श अबोली
अन मिठी ती काळजाची
आज सारेसारे आठविता
सुटते शपथ त्या मौनाची….
सांग , काय किती लाभले
होता सांजाळ जीवनाची
समाधाने कितीशी हुंगावी
ओंजळ ती बकुळफुलांची…..
तू अशी अबोली मनसुंदरा
तार छेडितेस या अंतराची
शब्दा शब्दात तुझी स्पंदने
गात्रात साथ सुरेल गीतांची…..
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*©️वि.ग. सातपुते.( भावकवी )*
*📞( 9766544908 )*