You are currently viewing झोका…

झोका…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा. सौ. सुमती पवार यांची अप्रतिम काव्यरचना*

*झोका ….*

आठवणींचा हा झोका मज नेई दूर दूर

किती बोला बोलू नये येतो आठवांना पूर…

आधी दिसे बालपण निरागस ते निर्लेप

नाही कळत काही ही मन उगा घेते झेप…

कडू गोड किती किती आठवणींचा उमाळा

नाही येत सांगता हो जीभ होई लोळागोळा..

बोलून तो होतोच मनालाच पश्चाताप

आठवता नाती काही लागे मनालाच ठेच…

सगे म्हणविती पण मनी मंथरा ती दुष्ट

नाती जवळची अशी देती मनाला हो कष्ट….

का न वागती सरळ प्रश्न मनाला गहन

येता जाता टोचती ते बनुनच दु:शासन …

काळ सुखाचा तो असा त्याला लावतात दृष्ट

नाही राहत ते सुखी सतावती पहा खाष्ट….

आई बाप ते प्रेमळ त्यांना लावतात चूड

बोलता न येते काही जाई बालपण हूड ..

काही नातलग असे जणू मिठाचा हो खडा

दैव शिकवते पहा त्यांना चांगलाच धडा

हाय हाय करतच पहा पकडती रस्ता

हाती लागेना हो काही जरी काढतात खस्ता..

अशी कशी ती घडण माणसांची काही काही

आठवता माणसे ती झोका दूर दूर जाई

वाटे मनाला हो खंत राहू शकले ना सुखी

झोका भूतकाळातला मन करतसे दु:खी …

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

दि : १३ मे २०२२

वेळ : दुपारी ३ : ४८

प्रतिक्रिया व्यक्त करा