You are currently viewing स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अंदमान वास्तव्यावर आधारित “धन्य ती बंदिशाळा” एकांकिका सादर

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अंदमान वास्तव्यावर आधारित “धन्य ती बंदिशाळा” एकांकिका सादर

निगडी प्राधिकरण-(प्रतिनिधी-बाबू डिसोजा कुमठेकर)

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, निगडी नगर, देहू गटातर्फे अखंड भारत संकल्प दिनानिमित्त शब्दरंग कला साहित्य कट्टा तर्फे दिनांक-१५ऑगस्ट२०२३ रोजी “धन्य ती बंदिशाळा” एकांकिकेचे रुपी नगर, दक्षता गणपती मंदिर ,तसेच परमपूज्य माधव सदाशिव गोळवलकर स्केटिंग हॉल प्रबोधनकार ठाकरे मैदान,यमुनानगर, निगडी या दोन्ही ठिकाणी सादरीकरण करण्यात आले.

रूपी नगर येथे डॉक्टर कुंदन पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून मसाप पिंपरी चिंचवड चे अध्यक्ष श्री. राजन लाखे, होते. या कार्यक्रमाचे आयोजन साहित्य कला संघ, रूपी नगर ने केले होते. पूजा काळे, पंढरीनाथ दरेकर, अनन्या शहागडकर, गुरुकृपा संगीत क्लासेस च्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रम यशस्वी केला.

कलाकार मा.सतिश सगदेव, चंद्रशेखर जोशी, सुभाष भंडारे, अशोक अडावदकर, आनंदराव मुळूक, युवराज गायधनी यांनी एकांकिका सादर केली. एकांकिकेचे दिग्दर्शक मा. अशोक अडावदकर, तर संहिता लेखन ज्योती कानेटकर यांचे होते.

गीत गायन मनिषा मुळे यांनी केले. रूपी नगर येथील कार्यक्रमाचे बहारदार सूत्र संचालन सीमा गांधी यांनी केले. तर ठाकरे उद्यान येथील एकांकिकेच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती कानेटकर यांनी केले.

दोन्ही ठिकाणी रसिकांची भरपूर उपस्थिती होती.

श्री आनंदराव मुळुक आणि चंद्रशेखर जोशी यांनी प्रस्तुत प्रतिनिधी-बाबू डिसोजा कुमठेकर यांना माहिती दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा