You are currently viewing कणकवली तालुक्याचा बारावीचा निकाल 96.78 टक्के…!

कणकवली तालुक्याचा बारावीचा निकाल 96.78 टक्के…!

कणकवली

कणकवली तालुक्यातील बारावीच्या परिक्षेला 1945 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यातील 1939 विद्यार्थी परिक्षेला प्रविष्ठ झाले. त्यामध्ये 1877 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून तालुक्याचा एकूण निकाल 96.78 टक्के लागला आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये 141 विद्यार्थी विशेष श्रेणीत, 802 विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर 833 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झालेत. तालुक्यात पहिले चार मानकरी हे कणकवली कॉलेजचे विद्यार्थी आहेत. या कॉलेजच्या वाणिज्य शाखेची विद्यार्थीनी सेजल सत्यवान परब हिने 94 टक्के गुणांसह तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला. द्वितीय प्राची धाकू मेस्त्री 93.83 टक्के, तृतीय क्रमांक सानिका दत्ताराम सावंत हिने 93.50 टक्के गुणांसह मिळविला असून ती तालुक्यात विज्ञान शाखेत प्रथम आहे. तर वाणिज्य शाखेचा यज्ञेश स्वप्निल पोकळे याने 93.33 टक्के गुणांसह तालुक्यात चौथा क्रमांक मिळविला.

कणकवली कॉलेजचा 95.76 टक्के निकाल!

कणकवली कालेजमधून 590 विद्यार्थी परिक्षेला प्रविष्ठ झाले होते. त्यातील 49 विशेष श्रेणी, 192 प्रथम श्रेणीत, 276 द्वितीय श्रेणीत असे एकूण 565 विद्यार्थी उत्तीर्ण होत 95.76टक्के निकाल लागला. त्यामध्ये वाणिज्य शाखेचा 98.80टक्के, विज्ञान शाखेचा 95.75 टक्के, कला शाखेचा 92.47 टक्के तर व्यावसायिक अभ्यासक्रम शाखेचा 82.85 टक्के निकाल लागला. वाणिज्य शाखेतून प्रथम सेजल सत्यवान परब 94 टक्के, द्वितीय प्राची धाकू मेस्त्री 93.83 टक्के, यज्ञेश स्वप्निल पोकळे 93.33 टक्के, विज्ञान शाखेतून प्रथम सानिका दत्ताराम सावंत 93.50 टक्के, द्वितीय मनाली नितीन तायशेटे 84.67 टक्के, तृतीय समर्थ लक्ष्मण लाड 84.17 टक्के, कला शाखेतून प्रथम चिन्मयी विजय जावडेकर 73.83 टक्के, द्वितीय बुशरा शेखजबीर बागवान 73.17 टक्के, तृतीय तन्वी संतोष भामले 67.67 टक्के, तर एमसीव्हीसी मधून प्रथम अंकिता संदिप नकाशे 76.73 टक्के, द्वितीय गितांजली गणपत पवार 73.67 टक्के, तृतीय सुकन्या काशिराम आडेलकर 73.33 टक्के गुण मिळविले आहेत.

एस.एम.ज्यू. कॉलेज

एस.एम.ज्यू. कॉलेजच्या विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के, वाणिज्य शाखेचा 87.50 टक्के तर व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमचा निकाल 81.54 टक्के लागला आहे. विज्ञान शाखेतील विवेक अनिल जाधव याने 80 टक्के गुण मिळवून तीनही विभागाती सर्व विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक मिळविला. विज्ञान शाखेत द्वितीय रघुनंदन जितेंद्र राणे 70.67 टक्के, तृतीय दिव्या रवींद्र सुतार 67.33 टक्के, विज्ञान शाखेत प्रथम मनीष रामदास गिरकर 67.33 टक्के, द्वितीय रसिका रवींद्र गुरव 63.67 टक्के व तृतीय रितेश रवींद्र मोदी 63.17 टक्के. एमसीव्हीसी विभागात प्रथम किशोर कृष्णा होळकर 70 टक्के, द्वितीय हर्षाली भिकाजी मांजरेकर 69.50 टक्के तर प्रणव रमेश निकम याने 69.33 टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला.

कनेडी कॉलेजचा निकाल 100 टक्के

कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित श्री. मोहनराव मुरारीराव सावंत जूनियर ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स श्री. तुकाराम शिवराम सावंत जूनियर कॉलेज ऑफ सायन्सचा आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स विभागाचा 100 टक्के निकाल लागला आहे. आर्ट्स मधून प्रविष्ट 42 विद्यार्थ्यापैकी 1 विद्यार्थी गैरहजर राहिला तर सर्व 41 विद्यार्थी उत्तीर्ण होत 100 टक्के निकाल लागला. त्यामध्ये विशेष प्रावीण्य 03, प्रथम श्रेणी 19, द्वितीय श्रेणी 19 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रथम सेजल सुनिल पाटील 80 टक्के, द्वितीय लक्ष्मण अशोक सदडेकर 75 टक्के व हर्षदा नितीन मेस्त्री 75 टक्के, तृतीय सायली श्रीधर सावंत 70.17 टक्के, सायन्स विभागातील प्रविष्ट सर्व 62 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामध्ये विशेष प्रावीण्य 06, प्रथम श्रेणी 55, द्वितीय श्रेणी 01 व निकाल 100 टक्के लागला. याविभागात प्रथम स्नेहा संजय पवार 80.50 टक्के, द्वितीय सलोनी सुहास कदम 77.83 टक्के, तृतीय गौरी दिपक देसाई 77.33 टक्के, तर कॉमर्समध्ये प्रविष्ट सर्व 65 विद्यार्थी उत्तीर्ण होत 100 टक्के निकाल लागला. विशेष प्रावीण्य 13, प्रथम श्रेणी 45, द्वित्तीय श्रेणी 07, प्रथम क्रमांक दीप्ती विलास गायकवाड 87.17 टक्के, द्वितीय निकिता अरुण लाड 84.00 टक्के, तृतीय क्रमांक मितेश राजेश पाताडे याने 82.50 टक्के गुणांसह मिळविला.

हरकूळ बुद्रुक ज्यू. कॉलेज

हरकूळ बुद्रुक समता सेवा संघ मुंबई संचलित अशोक मधुकर पावसकर कनिष्ठ महाविद्यालय कला व वाणिज्य हरकूळ बुद्रुकचा निकाल 100 टक्के लागला. एकूण 20 विद्यार्थी या परीक्षेला प्रविष्ट झाले होते त्यातील 9 कला तर 11 वाणिज्य शाखेमध्ये उत्तीर्ण झाले. कला शाखेमध्ये प्रथम स्वरुपा संतोष तांबे 81.67 टक्के, द्वितीय दिपेश दत्ता तेली 68.67 टक्के, तृतीय हर्षल विलास तेली 62.83 टक्के तर वाणिज्य शाखेतून अर्पिता अशोल मोडक 86.83 टक्के, द्वितीय दिक्षा संदिप खांदारे 84.33 टक्के, तृतीय सिद्धी सुरेश मोडक 82.83 टक्के गुण मिळविले.

तळेरे वामनराव महाडीक कॉलेज

तळेरे वामनराव महाडीक कॉलेज माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला, वाजिज्य, व विज्ञान महाविद्यालयाचा बारावी परिक्षेचा कला शाखेचा निकाल 82.35 टक्के लागला असून प्रथम अनुष्का सुभाष घाडी 76.33 टक्के, द्वितीय देवेन अनिल दुखंडे 72.00टक्के, तृतीय ऋतिक सुनिल घाडी 65.17 टक्के तर वाणिज्य शाखेचा 100 टक्के निकाल लागला असून प्रथम स्नेहल संतोष तळेकर 87.83 टक्के, द्वितीय प्रतिक्षा मारोतीराव गिरी 86.33 टक्के, तृतीय क्रमांक मिताली गोपाळ चव्हाण हिने 84.50 टक्के गुणांसह मिळविला.

फोंडाघाट राजाराम मराठे कॉलेजचा 100 टक्के निकाल!
ब्राम्हणेश्वर शैक्षणिक सामाजिक उन्नती मंडळ, फोंडाघाट संचालित कै.राजाराम मराठे उच्च माध्यमिक विद्यालय विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के लागला आहे. परीक्षेसाठी प्रविष्ट 36 विद्यार्थ्यांपैकी 28 विद्यार्थी विशेष श्रेणी व 8 विद्यार्थी प्रथम श्रेणीमधून उत्तीर्ण झाले. प्रथम चिन्मयी आशुतोष कानडे 73.50टक्के, द्वितीय ऐश्वर्या रामचंद्र माने 68.50टक्के, तृतीय शोभना योगेश्वर जंगम 67.83 टक्के गुण मिळविले.

कासार्डे कॉलेजचा 100 टक्के निकाल

कासार्डे ज्यू कॉलेजच्या कला विभागातून बारावीच्या परिक्षेत प्रविष्ट सर्व 25 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रथम दिक्षिता संजय लाड 76.83 टक्के, द्वितीय मालिनी सचिन लाड 67.67 टक्के, तृतीय सूरज संजय दळवी 64.33 टक्के. वाणिज्य शाखेतील प्रविष्ट सर्व 78 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून प्रथम अमित सखाराम तर्फे 84.33 टक्के, द्वितीय सुश्मीता सुरेश ठुकरूल 84.17 टक्के, तृतीय विशाखा शनेश राणे 78.50 टक्के, विज्ञान शाखेतून प्रविष्ट सर्व 66 विद्यार्थी उत्तीर्ण असून प्रथम स्वरांगी सुभाष जठार 72 टक्के, द्वितीय नेहा प्रकाश काळे 71.83 टक्के व तृतीय क्रमांक चैत्राली किशोर कुडतरकर हिने 71.33 टक्के गुणांसह मिळविला.

खारेपाटण ज्यू. कॉलेज

उद्योगश्री प्र.ल.पाटील ज्यु. कॉलेज ऑफ सायन्स, कॉमर्स अँड आर्टस्चा बारावी परिक्षेचा एकूण निकाल 99.46 टक्के तर तात्यासाहेब मुसळे तांत्रिक विद्याभवन उच्च माध्यमिकचा एकूण निकाल 93.61 टक्के लागला आहे. विज्ञान शाखेतून प्रविष्ट सर्व 53 विद्यार्थी उत्तीर्ण होत 100 टक्के निकाल लागला. प्रथम स्नेहा अशोक गुरव 76.50 टक्के, द्वितीय दिपाली मनसुख दयाणी 73 टक्के, तृतीय सानिया गणेश राऊत 72.83 टक्के, कला शाखेतून प्रविष्ट सर्व 29 विद्यार्थी उत्तीर्ण होत 100 टक्के निकाल लागला. प्रथम अनिषा अनंत पवार 77.66 टक्के, द्वितीय तन्वी विलास तांबे 73.83 टक्के, तृतीय माधवी सुनिल शेंगाळे 71.16. वाणिज्य शाखेतून प्रविष्ट 104 पैकी 103 विद्यार्थी उत्तीर्ण होत 99.03 टक्के निकाल लागला आहे. प्रथम सानिका सुधाकर कुलकर्णी 86.66 टक्के, द्वितीय झुल्फा अ.गफार काझी 86.17 टक्के, तृतीय सुहानी सुनिल मोरे 86 टक्के, इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी मधून प्रविष्ट 13 पैकी 11 विद्यार्थी उत्तीर्ण होत 84.61 टक्के निकाल लागला असून प्रथम दिपक राजेंद्र इंगळे 66.50 टक्के गुण मिळविले. ऑटो. इंजि. टेक्निकल मधून प्रविष्ट 25 पैकी 24 विद्यार्थी उत्तीर्ण होत 96 टक्के निकाल लागला असून प्रथम अरस्लान इम्रान ठाणगे 69.83 टक्के तर अकाऊंटंसी अँड ऑफिस मॅनेजमेंट मधून प्रविष्ट सर्व 9विद्यार्थी उत्तीर्ण होत 100 टक्के निकाल लागला असून पूनम बच्चूतानंद गुंडये हिने 74.50 टक्के गुणांसह प्रथम क्रमांक मिळविला.

फोंडाघाट ज्यू कॉलेजचा 98.96 टक्के निकाल

न्यू इंग्लिश स्कूल ज्यू. कॉलेज ऑफ आर्टस्, कॉमर्स अँड व्होकेशन फोंडाघाट ज्यू. कॉलेजमधून प्रविष्ट 291 पैकी 288 विद्यार्थी उत्तीर्ण होत 98.96 टक्के निकाल लागला. आर्टस् मधून प्रविष्ट 66 मधून 64 विद्यार्थी उत्तीर्ण होत प्रथम सारीका गुरुनाथ येंडे 72.50 टक्के, द्वितीय रिया राजेश मेस्त्री 71.83 टक्के, तृतीय मयुरी अनंत होळकर 71.50 टक्के, कॉमर्स मधून प्रविष्ट 114 पैकी 113 विद्यार्थी उत्तीर्ण होत प्रथम यश संदिप दळवी 89.17 टक्के, द्वितीय विठ्ठल बबन बोडके 76.83 टक्के, तृतीय देवदीप चंद्रकांत परब 76.33 टक्के, व्होकेशनल मधून प्रविष्ट सर्व 42 विद्यार्थी उत्तीर्ण होत प्रथम विक्रम विजय ठुकरूल 74.33 टक्के, द्वितीय रोहित राजेंद्र वाघाटे 72.67 टक्के, तृतीय क्रमांक विभागून सुदेश अविनाश सापळे व अनिश गणेश गुरव 72.50 टक्के. सायन्समधून प्रविष्ट सर्व 69 विद्यार्थी उत्तीर्ण होत प्रथम प्राची संदिप लाड 76.50 टक्के, द्वितीय पूजा देविदास राठोड 76 टक्के तर तृतीय क्रमांक रुपेश संतोष गवळी याने 71.50 टक्के गुणांसह मिळविला.

आयडीयल इंग्लिश स्कूलचा 100 टक्के निकाल

ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडीयल इंग्लिश स्कूल व ज्यू. कॉलेज सायन्स व कॉमर्स मधून बारावीच्या परिक्षेस प्रविष्ट सर्व 95 विद्यार्थी उत्तीर्ण होत 100 टक्के निकाल लागला. विज्ञान शाखेतून प्रथम प्रियांका आनंद पारकर 87 टक्के, द्वितीय सनील राजेश मोरे 82.50 टक्के, तृतीय अद्वैत किरण गुजर 80.33 टक्के, वाणिज्य शाखेतून प्रथम दिक्षा दिपक कुबल 72.33 टक्के, द्वितीय आदित्य रुपेश पटेल 71.83 टक्के, तृतीय प्रिती रामचंद्र दळवी 69 टक्के गुण मिळविले.

तळेरे मालंडकर ज्यू. कॉलेजचा 100 टक्के निकाल

मालंडकर ज्यू. कॉलेजचा 100 टक्के निकाल लागला असून सर्व 15 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये प्रथम अरविंद म्हसकर 67.67 टक्के, द्वितीय पूनम कदम 61.17 टक्के तर सानिका सावंत हिने 52.33 टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला.

कळसुली कॉलेजचा 96.61 टक्के निकाल

ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्टस कळसुलीचा निकाल 96.61 टक्के असून कला विभागात प्रथम सोनाली श्रीधर ठाकूर 78.50टक्के, द्वितीयमनिषा शरद कदम 76 टक्के, तृतीय मयुरी सुरेश सावंत 71.67 टक्के तर वाणिज्य विभागात प्रथम दर्शना राजेंद्र परब 88 टक्के, द्वितीय प्रिती प्रकाश परब 84.67 टक्के, तृतीय क्रमांक साक्षी बाबू लाड 83 टक्के गुणांसह मिळविला.

बिडवाडी कॉलेजचा 97.25 टक्के निकाल

माध्यमिक विद्यालय व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय बिडवाडीचा निकाल 97.25 टक्के असून प्रविष्ठ 34 पैकी 33 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रथम सलोनी सतिश चव्हाण 80.17 टक्के, द्वितीय रितेश मिलिंद लाड 76.83 टक्के, तृत्तीय क्रमांक किशोरी बिभीषण येरम हिने 75.67 टक्के गुणांसह मिळविला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 + 8 =