*पावसा…* घे आता तू पडान..
🌧️⛈️🌩️🌧️⛈️🌨️🌧️
आंबे झाले काजी सरले
रतांबे गेले घळान…
वाट कसली बघतस बाबा
घे आता तू पडान …
🥭🥭🍒🍒🥔🥔🥭🥭
बाजारात्सून कोट हाडलय
बूट ठेवन चप्पल काढलय
चाकरमानी मुंबयक गेलो
मिरगव गेलो सरान…
वाट कसली बघतस बाबा
घे आता पडान…
🚗🚛🚗🚛🩴🩴🩴🌂🌂🌂🧥🧥🧥
तुझा येवचा नक्की ठरला
म्हणान मळ्यात जॉत धरला
तुझ्या भरवश्यार भातव आता
पेरला न्हय रे व्हरान …
वाट कसली बघतंस बाबा
घे आता तू पडान…
🐮🌾🌾🐮🌾🌾🐮🌾🌾
शेणी भरली, लाकडा भरली..
माच करुन कुडी घातली..
खोप शिवान झाली आता
झाला भरुन सराण…
वाट कसली बघतंस बाबा
घे आता पडान…
🪵🪵🎋🎋🪵🪵🎋🎋🪵
बांडकी आरडान आरडान दमली
कुर्ली बिचारी बिळातच सुकली
गटार व्हाळ तळी आमची
जावंदे सगळा भरान…
वाट कसली बघतंस बाबा
घे आता पडान…
🦀🦀🐸🐸🦀🦀🐸🐸
🌧️🌊☔💦🌬️🌫️⛈️
श्री. सुधीर मच्छिंद्रनाथ गोसावी
काळसे, मालवण.
*संग्रह #अजित नाडकर्णी शुभांजित श्रुष्टी फोंडाघाट*
