You are currently viewing छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे तात्काळ स्थलांतर करा!

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे तात्काळ स्थलांतर करा!

मराठा समाजच्यावतीने तहसीलदार रमेश पवार यांना निवेदन;

कणकवली

कणकवली नगरपंचायत येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्थलांतर बाबत सर्वपक्षीय बैठक झाली होती. या बैठकीत पालकमंत्री उदय सामंत यांनी एक महिन्यात योग्य तो तोडगा काढला जाईल,असे आश्वासन दिले होते.आता महिना होऊन गेला तरी कुठलाही निर्णय झालेला नाही. त्यामुळे प्रशासन म्हणून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या ठिकाणी अपघात होऊ नये म्हणून योग्य ती खबरदारी घ्यावी, तसेच त्या पुतळ्याचे तात्काळ स्थलांतर करावे अशी मागणी कणकवली तहसीलदार रमेश पवार यांच्याकडे मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली.

यावेळी मराठा समाज समाजाचे भाई परब, सुशील सावंत, महेश सावंत,बच्चू प्रभुगावकर,बबलू सावंत,मनोज हिर्लेकर, संतोष पूजारे,मनोज सावंत आदींसह मराठा समाज कार्यकर्ते उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी लगत एक रस्ता चालू ठेवण्यात आला आहे, त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. तो रस्ता बंद करण्यात यावा व सर्व्हिस रस्त्यावर गतिरोधक करण्यात यावा.जेणेकरून वाहने सावकाश जातील प्रशासकीय पातळीवर या संदर्भात तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी देखील तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली.त्यावेळी तहसीलदार श्री.पवार यांनी महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, मराठा समाजाने केलेल्या मागणी संदर्भात चर्चा करत तातडीने प्रश्न सोडवा अशा सूचना केल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा