You are currently viewing कावळा आला नाही….!

कावळा आला नाही….!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*कावळा आला नाही….!*

 

पत्रावळं ठेवली

कावळा येईल

आता येईल

मग येईल…

कावळा आला नाही..!

पाणपक्षी उडाले

चिमण्या भरारल्या

कबुतर घुमलीत

वटवाघळ झुललीत..

कावळा आला नाही..!

कावळ्या कावळ्या

येरेयेरे येरेयेरे

खाऊनं घेरे….आवाज दिला

स्पर्श कररे……याचना केली

कावळा आला नाही..!

पत्रावळ सरकावलं

विनवणी केली

पिंडदानाला शिवायला

वाट बघितली…

कावळा आला नाही..!

नदीतिरी फिरलो

वाळूत पोळलो

मृताच्या इच्छेने

थकलो भागलो

कावळा आला नाही!तो ही रोजच्या मरणाला कंटाळला..कावळा सोबतचे कधीच निघून गेले

उरला मृतात्मा !!अन् मी बावळा!!

 

बाबा ठाकूर

चांदणछाया संग्रहातून..

प्रतिक्रिया व्यक्त करा