You are currently viewing विक्रांत सावंतांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी गाजणार

विक्रांत सावंतांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी गाजणार

विक्रांत सावंतांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी गाजणार

आरोग्य शिबिरे, मदतवाटप, महिला दशावतार आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

सावंतवाडी
जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्यकर्ते व हितचिंतकांकडून विविध सामाजिक, आरोग्यविषयक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे जंगी आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक बांधिलकी जपत हा वाढदिवस साजरा केला जाणार असून, आरोग्य शिबिरे, गरजूंसाठी मदतवाटप तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रमांचा समावेश करण्यात आला आहे.
२७ मे रोजी रात्री ठीक १२ वाजता ओटवणे हायस्कूलच्या पटांगणावर केक कापून वाढदिवस सोहळ्याची सुरुवात होणार आहे. त्यानंतर त्याच ठिकाणी भव्य महिला दशावतार नाट्यप्रयोग रंगणार आहे.

मोफत डोळे तपासणी व गरजूंसाठी मदतीचा हात

२८ मे रोजी दिवसभर विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. सरमळे येथील रमाई नगर येथे चार हायस्पीड फॅनचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच माजगाव येथील विक्रांत सावंत यांच्या निवासस्थानी ‘लॉरेन्स अँड मेयो’ यांच्या सहकार्याने मोफत डोळे तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात २५ गरजू रुग्णांना मोफत चष्म्यांचे वाटप केले जाणार आहे.

दोडामार्ग रुग्णालयाला भेटवस्तू

आरोग्य सेवेला हातभार लावण्यासाठी दोडामार्ग उपजिल्हा रुग्णालयातील महिला सुतिकागृहासाठी इंडक्शन मशीन आणि सात लिटरचा थर्मास भेट म्हणून दिला जाणार आहे. यावेळी नगराध्यक्ष चेतन चव्हाण, माजी नगराध्यक्ष संतोष नानचे तसेच जिल्हा परिषद सदस्य दीपक गवस उपस्थित राहणार आहेत. याशिवाय सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयालाही उपयुक्त भेटवस्तू देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

वाढदिवसानिमित्त संध्याकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वेत्ये येथील कलेश्वर पूर्वी देवी मंदिरात रात्री साडेआठ वाजता ‘राजा शिवाजी’ हा ऐतिहासिक चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. तर सोनुर्ली येथील कुळघर रंगमंचावर रात्री दहा वाजता भव्य दशावतार नाट्यप्रयोग सादर होणार आहे.
या सर्व कार्यक्रमांना तालुक्यातील नागरिक, कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विक्रांत सावंत यांच्या मित्रपरिवाराकडून करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा