दिवाणी न्यायालयाची इमारत कोव्हिडं सेंटर साठी द्या…

दिवाणी न्यायालयाची इमारत कोव्हिडं सेंटर साठी द्या…

शिवसेना तालुकाध्यक्ष बाबुराव धुरी

आय टी आय सुरू केल्यास विध्यार्थ्यांची होऊ शकते गैरसोय..

दोडामार्ग

दोडामार्ग तालुक्यातील शासकीय आय टी आय ची प्रवेश प्रक्रिया ही आय टी आय बाहेर पार्किंगच्या जागेत होत होती त्यावेळी बाबुराव धुरी यांनी सदरील प्रवेश प्रक्रिया वनखात्याच्या रेस्टहाऊस मध्ये सुरू करण्यासाठी शासनाकडे मागणी करून ती पूर्णत्वास नेली होती, आता शासनाने आय टी आय सुरू करण्याचे आदेश दिल्याने दोडामार्ग आय टी आय मध्ये सुरू वसलेले कोव्हिडं सेंटर त्या लगत असलेल्या दिवाणी न्यायालयात हलवावे अशी मागणी केली आहे.

महाराष्ट्र शासनाने आय टी आय सुरू करण्यास परवानगी दिली आहे मात्र दोडामार्ग आय टी आय च्या इमारतीत कोव्हिडं सेंटर आहे त्यामुळे याठिकाणी विद्यार्थ्याची गैरसोय होऊ शकते यावर पर्याय म्हणून कोव्हिडं सेंटरची व्यवस्था लगत असलेल्या दिवाणी न्यायालयात करावी व जोपर्यंत कोरोना ओसरत नाही तोपर्यंत दिवाणी न्यायालयाचा कारभार तहसीलदार कार्यालय दोडामार्ग येथून करावा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक व आमदार दीपक केसरकर यांच्याकडे केल्याचे प स सदस्य व शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांनी स्पष्ट केले.

आपल्या या मागणीचा गांभीर्याने विचार करून आय टी आय च्या इमारतीचा ताबा हा व्यवस्थापनाकडे दिला जाईल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा