You are currently viewing कोव्हीड लसीकरणाचा वेंगुर्लेत शुभारंभ

कोव्हीड लसीकरणाचा वेंगुर्लेत शुभारंभ

वेंगुर्ले तालुक्यातील पहिली लस शासकिय डॉक्टर पंडीत डवले यांना

वेंगुर्ले
कोव्हीड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेतील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्लेत तालुक्यात सोमवारी (दि. 25) वेंगुर्ले ग्रामीण रूग्णालय व शिरोडा उपजिल्हा रूग्णालयातील शुभारंभाची पहिली लस वेंगुर्ले ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ. पंडीत डवले यांना देण्यांत आली. वेंगुर्ले ग्रामीण रूiणालयात 99 जणांना तर शिरोडा उपजिल्हा रूग्णालयात 99 जणांना या कोव्हीड लसचा डोस देण्यांत येणार आहे. त्यांची लिस्ट आरोग्य विभागामार्फत करण्यांत आलेली आहे. या कोव्हीड लससाठी निवड करण्यांत आलेल्या लाभार्थीचे लसीकरण हे दि. 27, 28, व 29 तारीखपर्यत चालणार आहे. या लसीकरणांत 52 महिला व 47 पुरुष यांचे वेंगुर्लेत लसीकरण होणार असल्याची माहिती तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. अश्विनी माईणकर यांनी दिली.
यावेळी ओरोस जिल्हारूiणालयातील कोव्हीड लसीकरण विभागाचे प्रमुख डॉ. धर्मराज मिश्रा, वेंगुर्ले तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. अश्विनी माईणकर, वेंगुर्ले ग्रामीण रूग्णालयाच अधिक्षक डॉ. पी. डी. वजराटकर, वेंगुर्ले नगराध्यक्ष दिलीप गिरप, मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे, वैद्यकिय अधिकारी डॉ. पंडीत डवले, डॉ. निलेश अटक, डॉ. प्रल्हाद मणचेकर, डॉ. राजेश्वर उबाळे, डॉ. के. जी. केळकर, ग्रामीण रूग्णालयाच्या इनचार्ज श्वेता मांजरेकर, सिस्टर शालिनी अणसूरकर, विनीता तांडेल, आरोग्यसेवक राजेंद्रनाथ गोसावी, आरोग्य सहाय्यक डी.बी. मोरजकर यांचा समावेश होता.
वेंगुर्ले ग्रामीण रूग्णालयाअंतर्गत होत असलेल्या कोव्हीड लसीकरण उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी आडेली प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्यसेवक, आरोग्य सेविका तसेच आशाताई यांची तर शिरोडा उपजिल्हा रूग्णालयातील कोव्हीड लसीकरण मोहिमेसाठी रेडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्यसेवक, आरोग्य सेविका तसेच आशाताई यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती यावेळी तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. अश्विनी माईणकर-सामंत यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 − five =