You are currently viewing इचलकरंजीत माय आत्मनिर्भर बेटी अभियानची सांगता

इचलकरंजीत माय आत्मनिर्भर बेटी अभियानची सांगता

इचलकरंजीत माय आत्मनिर्भर बेटी अभियानची सांगता

इचलकरंजी / प्रतिनिधी

इचलकरंजी येथे माहेश्वरी युथ फाउंडेशन व रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने माय आत्मनिर्भर बेटी अभियान संपन्न झाले.या अभियानची सांगता सहभागी प्रशिक्षणार्थी मुलींना ट्राॅफी व प्रमाणपत्र प्रदान करुन तसेच
प्रमुख पाहुण्या लेखिका व वक्त्या डॉ.सौ.मनिषा भोजकर यांच्या चांगले जीवन , प्रेरणादायी व्यक्तीमत्व आणि त्यासाठी पोषक वातावरण अशा विविध विषयांना स्पर्श असलेल्या अभ्यासू मार्गदर्शनाने झाली.

आजच्या काळात मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा, त्यांना ऐतिहासिक शस्त्र कला अवगत व्हावी आणि स्व – संरक्षण करता यावे या उद्देशाने माहेश्वरी युथ फाउंडेशन व रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने
रोटरी क्लबच्या प्रांगणात
प्रशिक्षक महेश दिंडे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने लाठी काठी, तलवारबाजी , भालाफेक , दांडपट्टा अशा मर्दानी खेळाच्या प्रशिक्षणाचे ११ दिवसीय
शिबीर आयोजन करण्यात आले होते.यावेळी माय आत्मनिर्भर बेटी अभियान अंतर्गत
पर्यावरण जनजागृती, शारीरिक-मानसिक क्षमता विकासासाठी धाडसी ट्रेकिंगचे आयोजन करण्यात आले होते.तसेच
पोलीस स्टेशन व पोलिस यंत्रणेच्या संपूर्ण कामकाजाची ओळख करून देण्यासाठी पोलीस स्टेशनला भेटीचे आयोजन करण्यात आले. यावेळी
इचलकरंजी विभागातील सर्व महत्वाचे पोलीस अधिकारी, निर्भया पथक तसेच अनेक सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, पत्रकार बांधव यांनी या शिबिर काळात उपस्थित राहून प्रशिक्षणार्थी मुलींचे मनोबल वाढवले.


या शिबिरात सहभागी झालेल्या सर्व मुलींचे रक्त तपासणी शिबिर घेऊन, हेमोग्लोबिन व रक्त गट तपासण्यात आले.
या शिबिराची सांगता रविवारी शिबीरातील प्रशिक्षणार्थीं मुलींच्या लाठीकाठी, तलवारबाजी, भालाफेक दांडपट्टा कलेच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकाने करण्यात आली.तत्पूर्वी ,
प्रमुख पाहुण्या सुप्रसिद्ध लेखिका व वक्त्या डॉ.सौ. मनीषा भोजकर व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रशिक्षणार्थी मुलींना ट्राॅफी व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.यावेळी प्रशिक्षक महेश दिंडे , राहुल रेंदाळे व अन्य प्रशिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या
डॉ.सौ.मनिषा भोजकर यांनी मुलींना जीवनात निश्चित ध्येय साध्य करण्यासाठी चांगले व्यक्तीमत्व घडवावे , विविध कार्यातून देशाची व समाजाची सेवा करण्यासाठी प्रयत्नशील रहावे असे आवाहन केले.


यावेळी,माय फउंडेशनचे सेक्रेटरी डॉ. लक्ष्मीकांत तोष्णीवाल, रोटरी क्लब ऑफ़ इचलकरंजीचे अध्यक्ष सत्यनारायण धूत, सेक्रेटरी प्रकाश गौड , रोटरी क्लबसह माहेश्वरी युथ फौंडेशनचे पदाधिकारी ,सदस्य तसेच प्रशिक्षणार्थी मुली व पालक उपस्थित होते.
या अभियानसाठी रोटरी क्लबचे व माहेश्वरी युथ फाउंडेशनचे सदस्य गोपाल चांडक, नवनीत बांगड़, बालाप्रसाद भूतड़ा, संजय रांदड, अरुण बांगड व इतर सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × two =