You are currently viewing अदृष्य भिंत नात्यांची

अदृष्य भिंत नात्यांची

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*अदृष्य भिंत नात्यांची*

 

किती मजबूत धागे

होते आपल्या नात्यात

वीण होती घट्ट प्रेमाची

हात गुंफत हातात…

 

कधी पडलं अंतर

मुळीच कळलं नाही

कामात सदा गर्क

‌मन वाट बघत राही…!!

 

कारण नसता काही

का वाढला हा दुरावा

संपुष्टात येऊ लागला

नात्यातील तो पुरावा…!!

 

अबोल मी तूही मौन

नात्यांची अदृष्य भिंत

प्रीतफूल सुकत चालले

उरली केवळ खंत…!!

 

नि:शब्द असह्य जीवन

करु या सोक्षमोक्ष

तुझ्याकडे हसत टाकले

प्रेमाचे पुन्हा कटाक्ष..‌

 

बोलकं केलं तुला

परतलं सौख्य जीवनात

अदृष्य भिंत नात्याची

ढासळून गेली क्षणात.‌!!

~~~~~~~~~~~~~~~~

अरुणा दुद्दलवार@✍️

प्रतिक्रिया व्यक्त करा