*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*कशास पिता चहा समोर*
कशास पिता चहा समोर
पिऊ वाटतो मजला थोडा
नको नेमके तेच करता
विवेक मतीशी थोडा जोडा…..1
शिक्षण थोडे दिले आईने
“मायनस” होते माझे वय
असून शिक्षक माझी माय
आपण आता करता काय….2
बाळकडू ते व्यसनाधीनतेचे
करील माझा लवकर -हास
पौष्टिक असे विचार भरवा
भरवू नका मज *गैर घास*….3
ऐकलेन अर्धेच *अभिमन्युने*
अर्जुन गमावे *पुत्र* आपला
इतिहास असून साक्षी आजही
पुरावृत्ती त्याची करता कशाला….4
धडे द्यावेत *घडवण्याचे*
नाही लागत बिघडण्यास वेळ
बाहेर असतात त्याच्या शाळा
आयुष्याचा करतात *खेळ*……..5
विनायक जोशी 🖋️ठाणे
मीलनध्वनी/9324324157