You are currently viewing राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदी विद्या चव्हाण यांची नियुक्ती

राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदी विद्या चव्हाण यांची नियुक्ती

विभागनिहाय राष्ट्रवादी महिला अध्यक्षा जाहीर

मुंबई

राष्ट्रवादी महिला महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी  विद्या चव्हाण  यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

रुपाली चाकणकर यांची महाराष्ट्र महिला आयोगाच्या  अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर राष्ट्रवादीचं महिला प्रदेशाध्यक्षपद रिक्त झालं होतं. या पदावर आता विद्या चव्हाणयांची वर्णी लागली आहे. राष्ट्रवादी महिला राष्ट्रीय अध्यक्षा खासदार फौजिया खान  यांनी या निवडीची अधिकृतरित्या घोषणा केली.

या निवडीनंतर विद्या चव्हाण यांनी म्हटले की, देशातील महत्त्वाच्या विषयांकडे दुर्लक्ष होत आहे. महागाई प्रचंड वाढत आहे. आम्ही यावर सातत्याने आवाज उठवणार आहोत. रुपाली चाकणकर यांच्या नंतर अध्यक्षपद खाली होतं. आता यावर माझी निवड झाली आहे, असे विद्या चव्हाण म्हणाल्या. पहिल्यांदा आम्ही विभागवार अध्यक्ष करत असल्याचे त्यांनी सांगितले.

विभागनिहाय राष्ट्रवादी महिला अध्यक्षा

नागपूर विभाग – शाहीन हकीम
अमरावती विभाग – वर्षा निकम

मराठवाडा विभाग

औरंगाबाद विभाग – शाझिया शेख
लातूर विभाग – वैशाली मोते

पश्चिम महाराष्ट्र

पुणे विभाग – वैशाली नागवडे

कोकण विभाग

सिंधुदुर्ग विभाग – अर्चना घारे
ठाणे विभाग – ऋता आव्हाड

उत्तर महाराष्ट्र विभाग – अनिता परदेशी

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven − two =