You are currently viewing बाह्यरुग्ण विभागातील लघुशस्त्रक्रियागृहाला चांगला प्रतिसाद

बाह्यरुग्ण विभागातील लघुशस्त्रक्रियागृहाला चांगला प्रतिसाद

बाह्यरुग्ण विभागातील लघुशस्त्रक्रियागृहाला चांगला प्रतिसाद

300 पेक्षा जास्त मायनर प्रक्रिया पूर्ण

सिंधुदुर्गनगरी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील लघुशस्त्रक्रियागृहाचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते दिनांक 1 मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी संपन्न झाले होते. त्यानंतर मागील दोन महिन्यांत तेथे 300 पेक्षा जास्त मायनर प्रकिया पुर्ण करण्यात आल्या असून शरीरावरील विविध गाठींवरील शस्त्रक्रियांचा त्यात समावेश आहे. या शस्त्रक्रियांकरीता रुग्णांना रुग्णालयात दाखल होण्याची आवश्यकता नसल्याने व शस्त्रक्रिया त्वरित व त्याच दिवशी पुर्ण होत असल्याने या लघुशस्त्रक्रियागृहास रुग्णांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. शरीरावरील विविध गाठींचे शस्त्रक्रियेनंतर अचूक निदान हे याच रुग्णालयात सुरु झालेल्या हिस्टोपॅथोलॉजी विभागाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे या नव्याने सुरु करण्यात आलेल्या सुविधेचा रुग्णांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अनंत डवंगे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा