दिव्यांग बांधवांच्या ढोल बजाव आंदोलनाला यश
सिंधुदुर्ग
दिव्यांग विकास फाउंडेशन हक्क प्रणित समिती सिंधुदुर्ग यांच्यावतीने कामगार दिनाचे औचित्य साधून एक मे 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिव्यांग बांधवांचे ढोल बजाव आंदोलन छेडण्यात आले होते. या आंदोलनाची दखल घेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री नितेशजी राणे साहेब यांनी दिव्यांगांच्या समस्यांकडे लक्ष वेधले. त्यामधील प्रमुख मागणी जिल्हा परिषद 2025 – 26 5% निधी वाटप झाला नव्हता. याची जिल्हा परिषदने दखल घेऊन 5% निधी वितरणास सुरुवात केली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवड झालेल्या दिव्यांग बांधवांना दिलासा मिळाला आहे. त्याचप्रमाणे घरपट्टीमध्ये 50% सवलत द्यावी त्या संदर्भातही सकारात्मक चर्चा करून संबंधित ग्रामपंचायतींना तसे पत्र देण्यात आले आहे. व इतर समस्या संदर्भात शासन सकारात्मक निर्णय देण्याच्या विचाराधीन आहे. त्याबद्दल दिव्यांग विकास फाउंडेशन प्रणित हक्क समितीचे अध्यक्ष माननीय श्री अनिल शिंगाडे यांनी प्रशासन व माननीय पालकमंत्री तसेच पाठिंबा दिलेल्या संस्था सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल, तसेच राष्ट्रीय दृष्टीने महासंघ विभागीय शाखा कोकण व दिव्यांग बांधवांचे आभार मानले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना दिव्यांग विकास फाउंडेशन प्रणित हक्क समितीच्या अध्यक्षांनी असे आवाहन केले आहे की अशा दिव्यांगांच्या हक्कांसाठी,न्यायासाठी,लढा देण्यासाठी,व संघर्ष करण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. आणि संघटित व्हा एकत्र या असे आवाहन केले आहे. याबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
