You are currently viewing पुण्यभूमी महाराष्ट्र

पुण्यभूमी महाराष्ट्र

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रांजली भट्टगावकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*पुण्यभूमी महाराष्ट्र*

 

सह्याद्रीच्या कड्यातुनी

नाव शिवबाचे गर्जते

जय महाराष्ट्र माझा

मराठी गर्वाने बोलते १

 

ओवी, अभंग ,भारुड

इथे संत परंपरा

डफ,टाळ,चिपळ्यांचा

नाद खुलवी शाहिरा २

 

जपू रिती परंपरा

संस्कृतीचा बसे मेळा

नथ,नऊवारी साडी

घडे कौतुक सोहळा ३

 

असा महाराष्ट्र माझा

जिथे नद्या पूजनीय

वड, पिंपळ, तुळस

आम्हा झाडे वंदनीय ४

 

क्रांतिवीर इथे झाले

त्यांना वाहूया सुमने

राष्ट्र सर्वां सांगतसे

राहा तुम्ही एकतेने ५

 

देह सार्थकी लागला

आम्ही इथे जन्मा आलो

पुण्यभूमी महाराष्ट्र

इथे वाढलो खेळलो ६

 

*सौ,प्रांजली भट्टगावकर.*

*मीरारोड, मुंबई.*

प्रतिक्रिया व्यक्त करा