*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री वैशाली पडवळ (एंजल वैशु) लिखित अप्रतिम काव्यरचना*
शीर्षक – ‘धिंगाणा’
धिंग धिंग धिंगाणा, घालू धिंगाणा धिंगाणा धिंगाणा..
आली बघा वरात
नाचू सारे जोरात
बसलाय नवरदेव
घोडीवर तोऱ्यात
बघायला त्याला वळती, सगळ्यांच्याच माना…
धिंग धिंग धिंगाणा, घालू धिंगाणा धिंगाणा धिंगाणा..
नवरोबाचे मैतर
आले हो रंगात
नागिनीचा नाच
करतात जोशात
अहो कुणीतरी थोडं, पाणी आणा त्यांना…
धिंग धिंग धिंगाणा, घालू धिंगाणा धिंगाणा धिंगाणा..
करवल्या मिरवती
भलत्याच टेचात
नाच पाहून हसती
गालातल्या गालात
उभं राहून दमल्या की, बसायला जागा द्या ना..
धिंग धिंग धिंगाणा, घालू धिंगाणा धिंगाणा धिंगाणा
वराला पाहून वधू
लाजतेया मनात
वऱ्हाड्यांची गर्दी
झाली की रस्त्यात
लग्नाची घाई आता, झाली आहे सर्वांना…
धिंग धिंग धिंगाणा, घालू धिंगाणा धिंगाणा धिंगाणा…
_____________________________________
©️®️
✍️…एंजल वैशू ( वैशाली पडवळ )
अहिल्यानगर, महाराष्ट्र
