You are currently viewing कविता म्हणजे माझा ध्यास आहे, श्वास आहे. आजारात कविता संजीवनी आहे “- बाबू डिसोजा

कविता म्हणजे माझा ध्यास आहे, श्वास आहे. आजारात कविता संजीवनी आहे “- बाबू डिसोजा

स्वारगेट, पुणे

साहित्य सम्राट या संस्थेचे१५७ वे कविसंमेलन दलित स्वयंसेवक संघ मुख्यालय नेहरू स्टेडियम पुणे येथे जेष्ठ कवी बाबू डीसोजा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले त्यावेळी अध्यक्षीय भाषणात त्यांनी वरीलप्रमाणे विचार मांडले.

साहित्य सम्राट पुणे ही संस्था सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम घेत असते. साहित्य संवर्धनाच्या उपक्रमातील शब्द गोड दिवाळी हा बहारदार कार्यक्रम दर वर्षी होत असतो. या उपक्रमातील वैशिष्ट्ये म्हणजे कलाकारांच्या कला, कविजनांचे काव्य आणि सर्वांच्या घरातील स्त्रियांनी बनविलेला फराळ, या तिन्हींचा आस्वाद म्हणजे कला-काव्य फराळ. हा उपक्रम वर्षभर साहित्यिकांना वाट पाहण्यास भाग पाडतो. असे मत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनोदजी अष्टुळ यांनी प्रास्तविकात व्यक्त केले.

मुख्य अतिथी गझलकार म.भा. चव्हाण, डी.एस.एस.चे माजी संघप्रमुख दादासाहेब सोनावणे, प्रल्हाद शिंदे आणि विनोद अष्टुळ उपस्थित होते.

विचारपीठावरील सर्व मान्यवरांनी आपल्या भाषणात साहित्य सम्राटचे अभिनंदन आणि भरभरून कौतुक केले.

संस्थेतर्फे जेष्ठकवी प्रल्हाद शिंदे यांचा ७१ वा वाढदिवस केक कापून साजरा केला.

“अपुल्या या जीवनाला ,रंग सखे देऊ नवा
स्वर्ग सुखाचा आनंद ,पुन्हा पुन्हा घेऊ नवा”
असे कवी सीताराम नरके आपल्या कवितेत म्हणाले.

“ध्यास मला हा लोककलेचा चाळ बांधते पायात ढोलकीच्या मी ठेक्यावरती धुंद नाचते तालात ”
असे कवी प्रल्हाद शिंदे मामा कवितेत म्हणाले.

साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या वर लिहीलेल्या कवितेत कवी बाबू डिसोजा यांनी
“वाटेगांवचा हिरा साहित्याचा खरा मुकुटमणि
भोगले ते लिहिले समरसून आयुष्याच्या रणी ”
अशी आदरांजली वाहिली.

साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या सुप्रसिद्ध फकिरा कादंबरीतील जोगणी या शब्दा ऐवजी जोगतीण हा शब्द पुणे विद्यापीठाच्या संदर्भ ग्रंथात वापरल्याने शुर वीर प्रथेला आणि कादंबरीला धक्काच बसला होता. त्यामुळे जोगणी म्हणजे काय हि शूर प्रथा विनोद अष्टुळ यांनी जोगणी या गेय कवितेतून रसिकांसमोर आणली. त्या कवितेने सर्वांची मने जिंकली.
“जाण रे जाणे गड्या जाण जोगणी
हि जातीवंत मर्दांची शान जोगणी”

कविसंमेलनात पहिल्या फेरीत स्वलिखित काव्य सादरीकरण तर दुसऱ्या फेरीत हिंदी मराठी गीतांचा भन्नाट कार्यक्रम झाला.
डॉ.पांडुरंग बाणखेले, शिवाजी उराडे, ऋचा कर्वे, श्रीकांत वाघ, बालकृष्ण बाचल, डॉ.शुभा लोंढे, सनी डाडर, अरुण कांबळे, योगिता कोठेकर, नानाभाऊ माळी, आशा शिंदे, बाबा ठाकूर, ऍड.रमाकांत आदमाने, लक्ष्मण लोंढे, दत्ता धडे, बाळासाहेब रणदिवे, नारायण डोलारे, साहेबराव खंडागळे, म.भा.चव्हाण, दादासाहेब सोनवणे, माधुरी वैद्य डिसोजा या सर्वांच्या रचनांना उत्स्फूर्त दाद मिळाली.
कविसंमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन प्रख्यात सूत्रसंचालक कवी मा. जगदीश वनशिव यांनी केले.
आभारप्रदर्शन नानाभाऊ माळी यांनी केले.
दिवाळी फराळाने कार्यक्रमाची सांगता झाली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 + 6 =