You are currently viewing शहीद लक्ष्मण गवस स्मारकाचे लोकार्पण

शहीद लक्ष्मण गवस स्मारकाचे लोकार्पण

दोडामार्ग

आतापर्यंत तेरवण गावाकडे दुर्लक्ष झाले . मात्र , ही चूक सुधारत यापुढे वंचित राहिलेला विकास पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून करण्यात येईल . शहीद लक्ष्मण गोपाळ गवस यांचे स्मारक येथील गावासह पंचक्रोशीतील युवकांना प्रेरणादायी ठरेल , असे गौरवोद्गार भाजप • जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी काढले . तेरवण येथील शहीद स्मारक लोकार्पण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते . पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण होणार होते . मात्र , चव्हाण यांना तातडीने नागपूर येथे जावे लागल्याने आपले प्रतिनिधी सदस्य म्हणून त्यांनी तेली यांना पाठविले .

यावेळी व्यासपीठावरजिल्हा उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी , नाडकर्णी , शिवसेना ठाकरे गट उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी , महादेव बद्रि भाजप जिल्हा प्रवक्ते संजू परब , तेरवण – मेढे सरपंच सोनाली गवस , भाजप तालुकाध्यक्ष सुधीर दळवी , शिवसेना ठाकरे गट तालुकाप्रमुख संजय गवस , संदीप धर्णे , सरपंच सेवासंघ जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस , जि . प . माजीसदस्य चंदू मळीक , वीरपत्नी भागीरथी गवस , सेवानिवृत्त कॅप्टन कृष्णा गवस , नितीन पाटील , चंद्रकांत गवस यांच्यासह इसापूर , वाघोत्रे ,मिरवेल , नामखोल , मेढे गावातील ग्रामस्थ तसेच दशक्रोशीतील आजी – माजी सैनिक मोठ्या संख्यने उपस्थित होते . घाटरस्ते जोडणार ! तेली पुढे म्हणाले , सिंधुदुर्ग सीमा जोहणारे सर्व घाटरस्ते येत्या वर्षभरात जोडण्याचा मानस मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केला आहे . त्याच धर्तीवर तेरवणच्या नियोजित घाटरस्त्याचे काम हाती घेऊन पूर्णत्वास नेण्यात येईल . काम सुरू झाल्यानंतर ते करून घेण्याची जबाबदारी डी येथील स्थानिक ग्रामस्थांची आहे . ग्रामस्थांनी चांगल्या पद्धतीचे काम करून घ्यावे . तेरवण गावात उभारलेल्या शहीद स्मारकामुळे येथील युवावर्ग तसेच या परिसरात येणारे पर्यटक प्रेरणा घेतील . अध्यक्षस्थानावरून महादेव वांद्रे यांनी तेरवण येथील लक्ष्मण गोपाळ गवस शहीद स्मारक समिती , ग्रामस्थ , देणगीदारांचे आभार व्यक्त केले . तसेच तेरवण गावातील विकासाकडे लक्ष देऊन विकासकामे मार्गी लावण्याची मागणी केली . यावेळी एकनाथ नाडकर्णी , नितीन पाटील , बाबुराव धुरी , संजू परब आदींनी मनोगत व्यक्त केले . स्मारक लोकार्पण कार्यक्रमाच्या सुरुवातीला शहीद स्मारक इमारतीच्या प्रवेशद्वाराचे उद्घाटन तेली व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले . त्यानंतर मुख्य स्मारकाचे अनावरण करण्यात आले . शहीद स्मारक समितीकडून सत्कार शहीद स्मारक समिती , तेरवण यांच्याकडून दशक्रोशीतील आजी – माजी सैनिक , त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा यावेळी शाल , श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . यावेळी काही माजी सैनिकांनी भाषणात जुन्या आठवणींना उजाळा दिला . १ ९ ७१ च्या भारत – पाक युद्धात झाले होते शहीद लक्ष्मण गोपाळ गवस यांना १ ९ ७१ च्या भारत – पाक युद्धात वीरमरण आले होते . मात्र त्यावेळी तेरवणवासीयांना त्यांचे स्मारक उभारणे शक्य झाले नाही . परंतु ही उणीव तब्बल ५२ वर्षांनंतर तेरवणवासीयांना भरून काढली . शहीद स्मारक समिती स्थापन करून आवश्यक निधी संकलन केले . आपल्या गावचे नाव उज्ज्वल केलेल्या शहीद लक्ष्मण गवस यांचे स्मारक एकजुटीने उभारले .

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − 5 =