You are currently viewing बांद्यातील स्वच्छतागृह तात्काळ खुले न केल्यास रियाज शेख यांचा आंदोलनाचा इशारा

बांद्यातील स्वच्छतागृह तात्काळ खुले न केल्यास रियाज शेख यांचा आंदोलनाचा इशारा

बस स्थानकाच्या वाहतूक नियंत्रणकांना दिले निवेदन…

बांदा

येथील बसस्थानक आवारातील स्वच्छतागृहाचे येत्या आठ दिवसात उद्घाटन करुन प्रवाशांसाठी खुले करावे, अन्यथा बसस्थानकातच प्रखर आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना अल्पसंख्यांक उप तालुकाप्रमुख रियाज खान यांनी दिला आहे. तसे लेखी निवेदन बांदा बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक अनंत पै यांना सादर केले.

बांदा बसस्थानक आवारात प्रवाशांच्या सोयीसाठी सुसज्ज स्वच्छतागृह बांधण्यात आले आहे. मात्र अद्यापपर्यंत त्याचे उद्घाटन करुन प्रवाशांसाठी खुले केलेले नाही. सेनेचे रियाज खान यांनी यापूर्वीही दोन वेळा एसटी प्रशासनाचे लक्ष वेधले होते. मात्र, कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे विशेषतः महिला प्रवाशांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. येत्या काही दिवसात शाळा, कॉलेज सुरु होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर येत्या आठ दिवसात स्वच्छतागृह सुरु करण्याची मागणी रियाज खान यांनी केली आहे. अन्यथा प्रवाशांना सोबत घेऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

यावेळी वाफोली ग्रा. पं. सदस्य मंथन गवस, संजय आईर, व्यंकटेश ऊरुमकर, मोहसीन खान, राजा खान, महेश शिरोडकर, सागर धोत्रे, नंदकिशोर कांबळे, अन्वर खान, विश्वास पंडीत, संजय बांदेकर, आबा धुरी, सदा राणे, सोहेल जमादार यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight − 5 =