You are currently viewing आनंदीबाई रावराणे महाविद्यालयामध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स व स्किल डेव्हलपमेंट सेंटरचे उद्घाटन

आनंदीबाई रावराणे महाविद्यालयामध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स व स्किल डेव्हलपमेंट सेंटरचे उद्घाटन

*आनंदीबाई रावराणे महाविद्यालयामध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स व स्किल डेव्हलपमेंट सेंटरचे उद्घाटन*

वैभववाडी

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग तसेच महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयांमध्ये सुरू असलेल्या करिअर कट्टा विभागामार्फत १९ ऑगस्ट,२०२३ रोजी महाविद्यालयामध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स व स्किल डेव्हलपमेंट सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. सेंटर ऑफ एक्सलन्सच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या महाविद्यालयीन व परिसरातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही अभ्यासिका सकाळी आठ ते संध्याकाळी आठ पर्यंत खुली असणार आहे. या अभ्यासिकेमध्ये शंभर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी बसण्याची सोय तसेच ऑनलाईन तासिकांची सोय सुद्धा करण्यात येणार आहे. या अभ्यासिकेमध्ये एमपीएससी, यूपीएससी, बँकिंग व स्टाफ सिलेक्शच्या विविध परीक्षेसाठी लागणारी सर्व स्पर्धा परीक्षा पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
सेंटर ऑफ एक्सलन्सच्या माध्यमातून उद्योजक संसद महाविद्यालयामध्ये निर्माण करून त्या उद्योजक संसदेमार्फत विद्यार्थ्यांना उद्योगांचे प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जाणार आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच वेगवेगळ्या उद्योगाचे कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये आत्मसात व्हावे यासाठी महाविद्यालयामध्ये उद्योजक संसद स्थापन होणार आहे.
स्किल डेव्हलपमेंट सेंटरच्या माध्यमातून महाविद्यालयामध्ये विज्ञान विभाग, वाणिज्य विभाग व कला विभाग यामध्ये वेगवेगळी कौशल्य आधारित कोर्स सुरू होणार आहेत. या कौशल्य विकासावर आधारित कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविण्याचे उद्दिष्ट स्किल डेव्हलपमेंट सेंटरचे आहे.
महाराष्ट्रातून फक्त शंभर महाविद्यालयांमध्ये हे सेंटर व स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू होणार आहेत. यासाठी आनंदीबाई रावराने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वैभववाडी या महाविद्यालयाची सुद्धा निवड झालेली आहे. या सेंटर ऑफ एक्सलन्स व स्किल डेव्हलपमेंट सेंटरचे उद्घाटन महाराणा प्रताप सिंह शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष श्री.सदानंद रावराणे यांचे शुभ हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे सचिव श्री.शैलेंद्र रावराणे, सहसचिव श्री.विजय रावराणे, विश्वस्त श्री.शरदचंद्र रावराणे, स्थानिक समितीचे अध्यक्ष श्री.सज्जन काका रावराणे, विश्वस्त श्री.निलेश रावराणे हे प्रमुख अतिथी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावना करिअर कट्टा विभागाचे सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक डॉ. अजित दिघे यांनी केली. महाविद्यालयाचे प्राचार्य तथा करियर कट्टा विभागाचे सिंधुदुर्ग जिल्हा प्राचार्य प्रवर्तक डॉ. सी. एस. काकडे यांनी विद्यार्थ्यांना करिअर कट्टा विभागामार्फत चालवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आवाहन केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. विजय शिंदे यांनी केले व शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

 

*संवाद मिडिया*

*🎊विशेष सूट…!!🎊विशेष सूट…!!🎊विशेष सूट…!!🎊*🏃‍♀️🏃‍♂️

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*खास स्वातंत्र्यदिनानिमित्त तब्बल *💫50% सूट..!!💫*

*_🏢सावंतवाडीचे प्रसिद्ध*

*👗किया फॅशन👘*

*कपड्याचे दालन घेऊन आले आहेत प्रत्येक खरेदीवर तब्बल 💫५० टक्के पर्यतची सूट..!!💫*

*_👼👧🧒लहान मुलांसह महिलांना 👩‍⚖️ लागणारे फॅन्सी कपडे 👘 २०० पासून अगदी २ हजारापर्यंत🤗_*

*_रेडीमेड ड्रेस 👘, लेगिन्स👖, प्लाझो👖, कुर्ती👘, कॉटन पॅन्ट👖, नाईटी 👘आणि बरेच काही…!!🤗_*

*_त्याचबरोबर नवजात बालकांपासून👶🏻 पंधरा वर्षापर्यंतच्या मुलांचे 👦🏻कपडे उपलब्ध…!!🤗_*

*🎴आमचा पत्ता:-*
*दत्तात्रय निवास-गांधी चौक, सावंतवाडी, शॉप नंबर १५, तारा हॉटेल समोर*

*◾प्रोप्रा:-*
*सौ. निकीता नंदादिप चोडणकर*

*📲संपर्क:-*
*9403920802*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/106270/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा