You are currently viewing हाक आमची साथ कणकवली करांची!..

हाक आमची साथ कणकवली करांची!..

कणकवली वासियांनी अजून सहा दिवस जनता कर्फ्युला साथ द्या

नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे आवाहन

कणकवली

कणकवली शहरात गेले दोन दिवस सर्वांच्या साथीने जनता कर्फ्यु यशस्वी झाला. शहरवासीय,व्यापारी, सामाजिक संस्था,स्वयंसेवी संघटना, नगरसेवक,पदाधिकारी आदींनी सहकार्य केले तसेच सहकार्य अजून पुढील सहा दिवस करून हा आठ दिवसांचा जनता कर्फ्यू यशस्वी करूया. शहरात कोरोनाच्या रुग्ण संख्येतील वाढ रोखण्यासाठी व कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आपण सर्वानुमते हा निर्णय घेतला आहे. सर्व नागरिक, व्यापारी, सर्व नगरसेवक व विविध संघटनांच्या जोरावरच हा निर्णय गेले दोन दिवस यशस्वी झाला आहे. यापुढेही नगरपंचायत ला आपणा सर्वांची साथ आवश्यक आहे. गेल्या दोन दिवसांच्या यशस्वी जनता कर्फ्युमुळे जिल्ह्यात कणकवलीवासीयांच्या एकीचे दर्शन झाले आहे.कोरोनाच्या मागील सात महिन्यांच्या काळात वेळोवेळी केलेल्या आवाहनाला कणकवलीवासीय धावून आले व नगरपंचायतीच्या निर्णयाला साथ दिली.तशीच साथ अजून पुढील सहा दिवस द्या.आजमितीला आपणाला कोरोनाशी लढायचे आहे इतर कुणाशी नाही.त्यामुळे तुमच्या साथीने हा लढा यशस्वी होऊ शकतो. तर चला मग आपला निर्धार पुरा करु.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 + nine =