You are currently viewing आंबोली येथे आयशर टेम्पो ट्रॅव्हलर यांच्यात अपघात

आंबोली येथे आयशर टेम्पो ट्रॅव्हलर यांच्यात अपघात

दहा जण जखमी, दर्शन घेऊन परतताना घडली घटना जखमीवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार…

सावंतवाडी

आयशर आणि टेम्पो ट्रॅव्हलर समोरासमोर आदळल्याने झालेल्या अपघातात दहा जण जखमी झाले. ही घटना आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास आंबोली-कोल्हापूर राज्य महामार्गावर आजरा फाटा परिसरात घडली. दरम्यान जखमींना अधिक उपचारासाठी आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. संबंधित टेम्पो ट्रॅव्हलर मधील प्रवासी आदमापूर येथून बाळूमामाचे दर्शन घेऊन परतताना वाटेत हा अपघात घडला.
याबाबत अधिक माहिती अशी की, यात यवन कोकाटे आणि सहर्ष कोकाटे रा.पिंगुळी हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या पायाला मोठी दुखापत झाली. संबधित जखमी हे आदामापुर बाळूमामा येथून दर्शन घेऊन परत येताना सकाळी अपघात झाला. अपघातानंतर आंबोली आरोग्य केंद्रात १०८ रुग्णवाहिकेने चालक अर्जुन राऊत याने जखमींना आरोग्य केंद्रात दाखल केले. यावेळी येथील डॉक्टर महेश जाधव आणि आदिती पाटकर यांनी जखमींवर उपचार केले. यानंतर पुढील उपचारासाठी सावंतवाडी येथे नेण्यात आले. आंबोली पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य रोहिणी गावडे यांनी जखमींची विचारपूस केली

प्रतिक्रिया व्यक्त करा