You are currently viewing कणकवली कसवण हळवल माळावर जुगाराची जंबो बैठक

कणकवली कसवण हळवल माळावर जुगाराची जंबो बैठक

*कणकवली कसवण हळवल माळावर जुगाराची जंबो बैठक*

*खाकीचे शिलेदार “कापू वरात” चा वरदहस्त*

कणकवली तालुक्यातील कसवण हळवल येथील माळावर जुगाराची जंबो बैठक बसत असून कडक शिस्तीचे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा पोलिस अक्षिक्षकांच्या खाकीचा शिलेदार “कापू वरात” चा वरदहस्त लाभल्याने माळरानावर रोज रात्री ८.३० वाजता जुगाराची जंबो बैठक बसत आहे. या बैठकीतून लाखोंची उलाढाल होत असून तरुणाई जुगाराच्या नादी लागून बिघडत आहे.
कसवण हळवल माळावरील बैठकीचे पार्टनर हे सावंतवाडी, कट्टा, कणकवली, ओवळीये येथील बडे जुगारी आहेत. पत्त्यांचे पान काढून डाव अंदर बाहर करताना हात चलाखी करण्यात हुशार असणारा बस ड्रायव्हर जुगाराचा पट मारतो. त्याच्या हात चलाखी वर देखील जुगारी खेळींची करडी नजर असल्याचे देखील समजते. *** हॉटेल चे मालक मेहुणा भावोजी देखील या जुगाराच्या मैफिलीत रंग आणतात. आ(कां)द्रू आणि केळेकर सातको हे बैठकीचे पहरेदार म्हणून काम करतात.
आपल्या कर्तव्यात तत्पर असणाऱ्या जिल्हा पोलिस अधीक्षकांचा जिल्ह्यातील काही गावांमध्ये खाकीच्या आशीर्वादाने सुरू असलेल्या जुगाराच्या अवैद्य धंद्यावर होत असलेला दुर्लक्ष जुगाराच्या मैफीली वाढण्यास कारणीभूत ठरत आहे. “कापू वरात” सारख्या जुगाराला मदत करणाऱ्या शिलेदारांवर कडक कारवाई केल्यास इतरांची बैठका बसविण्याची हिम्मत होणार नाही. कसवण हळवल माळावर सुरू असलेल्या जुगाराच्या जंबो बैठकांमध्ये जिल्हा पोलिस अधीक्षक काय कारवाई करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

*संवाद मीडिया*

*☘️विजयादशमी म्हणजे विजयोत्सव.☘️*

● निऑस, ऑरा सीएनजीची खरेदी म्हणजे प्रदूषणावर विजयाची सुरुवात..🚗

*🚙ही विजयादशमी साजरी करा पर्यावरण पूरक कार खरेदी करूनच…🚙*

💁‍♂️त्वरित एक्स्चेंज
💁‍♂️लोन सुविधा उपलब्ध

*🚗MAI HYUNDAI🚗*
अविरत सेवेची 25 वर्षे

📍उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.
*📲 फो. +917410006037*

📍वृक्षवल्ली नर्सरी कंपाऊंड, वागदे, कणकवली.
*📲फो. +917410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113471/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा