You are currently viewing चेन्नईच्या राज्यपालांच्या हस्ते सावंतवाडीतील जागतिक किर्तीचे चित्रकार आनंद ठोंबरेंचा सत्कार

चेन्नईच्या राज्यपालांच्या हस्ते सावंतवाडीतील जागतिक किर्तीचे चित्रकार आनंद ठोंबरेंचा सत्कार

सावंतवाडी :

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील जागतिक किर्तीचे चित्रकार आनंद ठोंबरे यांनी स्वामी विवेकानंद यांचे काढलेले नऊ बाय सहा फुटाचे तैलचित्र चेन्नईच्या राजभवनात नुकतच लावण्यात आले. चेन्नईचे राज्यपाल आर.एन.रवी यांच्या हस्ते या पेंन्टीग्जचं अनावरण करण्यात आले. यावेळी आयपीएस आनंदराव पाटील, आयपीएस रवीराजन तिवारीएडीसी, आयपीएस विश्वेष शास्त्री यांच्या उपस्थितीत शाल आणि लक्ष्मीची फ्रेम देवून राज्यपाल आरएन रवी यांनी चित्रकार आनंद ठोंबरे यांचा सत्कार केला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची मुलगी अनन्या ठोंबरे उपस्थित होती. चित्रकार आनंद ठोंबरे यांनी साकारलेले स्वामी विवेकानंद याचे तैलचित्रं कन्याकुमारीच्या केंद्रात लावण्यात आले असून पॅरिसमधील प्रिंन्स अलिखान, मातोश्रीवरील बाळासाहेब, मॅासाहेब, धिरूभाई अंबानी, ठाण्यातील आनंद दिघे यांचे काढलेले तैलचित्र, कुडाळ, सावंतवाडी रेल्वेस्टेशनवरील मधु दंडवते यांची तैलचित्र अद्यापही लक्षवेधी ठरलेली आहेत. पंतप्रधानांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या हस्ते माटुंग्याच्या वेलिंगकर कॅालेजमधे ठोंबरे यांना नुकतचं सन्मानित करण्यात आले होते. चेन्नईच्या शासनाकडून महाराष्ट्रातल्या जागतिक किर्तीच्या चित्रकाराचा बहुमान करण्यात आल्याने ठोंबरेंच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा