You are currently viewing छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७’ या योजनेच्या लाभापासून जिल्ह्यातील जवळपास 2500 शेतकरी लाभापासून अद्यापही वंचित…

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७’ या योजनेच्या लाभापासून जिल्ह्यातील जवळपास 2500 शेतकरी लाभापासून अद्यापही वंचित…

मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी वेधले जिल्हाधिकऱ्यांचे लक्ष

कुडाळ

शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 या योजनेपासून जिल्ह्यातील जवळपास अडीज हजार शेतकरी अद्यापही वंचित असल्याने मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांना पत्र लिहून त्यांचे लक्ष वेधले व प्रलंबित लाभधारक शेतकऱ्यांना तात्काळ लाभ मिळण्यासाठी शासनाशी पत्रव्यवहार करावा अशी विनंती केली आहे.यामध्ये
महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना कर्जाच्या बोजातून दिलासा देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ ही कर्जमाफी योजना अंमलात आणली होती.त्यानुसार शासनाने जिल्ह्यातील कर्जदार शेतकऱ्यांचे ऑनलाईन प्रणालीने अर्ज मागविले होते.सदरील अर्जांची छाननी होवून मंजुरी दिलेल्या ग्रीन लिस्ट यादी नुसार शेतकऱ्यांचे दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात आले होते.मुदतीत तसेच कर्ज परतावा केलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर २५ हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यात आले होते. जिल्ह्यात सदरील योजनेत पात्र ठरलेले ग्रीन लिस्ट यादीत समाविष्ट असलेले जवळपास 2500 शेतकरी अद्यापही लाभापासून वंचित आहेत.याबाबत जिल्हा सहकार विभाग कार्यालयाकडून माहिती घेतली असता त्यांनी सदरील योजनेतील अनुदान वाटप प्रक्रिया सहकार आयुक्त पातळीवरून होत असल्याने ‘महाऑनलाईन’ या बाह्यस्त संस्थेद्वारे नियंत्रणात असल्याचे सांगितले आहे.सद्यास्थित आघाडी सरकारने शेतकऱ्यांना महात्मा फुले कर्जमुक्ती योजना अंमलबजावणी चालू केल्याने मागील योजनेतील अनुदान वाटप कामकाजावर पूर्णतः दुर्लक्ष झालेले आहे.परिणामी शेतकरी आपल्या हक्काच्या लाभापासून वंचित राहिला आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा लाभ मिळणेसाठी मा.आयुक्त सहकार विभाग यांचे कार्यालयाशी पत्रव्यवहार करून मागील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ या योजनेच्या कामकाजाबाबत लक्ष वेधावे व शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा लाभ मिळवून द्यावा अशी विनंती सदर निवेदनातून करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 + 4 =