You are currently viewing शिक्षकानेच आवळला विद्यार्थ्याचा गळा…

शिक्षकानेच आवळला विद्यार्थ्याचा गळा…

शिक्षकानेच आवळला विद्यार्थ्याचा गळा…

दुसऱ्या विद्यार्थ्याने थेट मोबाईलवर व्हिडीओ बनविल्यामुळे सर्व प्रकार उघड

संबंधितावर कारवाई करण्याची जिल्हावासीयांची मागणी…

कुडाळ

अभ्यासाचे धडे देणार्‍या शिक्षकाने विद्यार्थ्याला मारहाण करुन त्याचा गळा आवळल्याचा प्रकार जिल्ह्यातील एका नामांकित शाळेत घडला आहे. वर्गातील अन्य एका विद्यार्थ्याने थेट मोबाईलवर व्हिडीओ बनविल्यामुळे हा सर्व प्रकार उघड झाला. दरम्यान आपण अडचणीत येवू नये म्हणून त्या शिक्षकाने विद्यार्थ्याच्या घरी जावून माफी मागितली. मात्र हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे खळबळ उडाली असून या प्रकाराबाबत शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि शिक्षण विभाग नेमकी कोणती भूमिका घेतो, हे पाहणे गरजेचे आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, हा प्रकार जिल्ह्यातील एका नामांकित शाळेत घडला आहे. संबंधित विद्यार्थ्याच्या डोक्यात मारल्यानंतर तो शिक्षक त्याचा थेट गळाच आवळत असल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. ही घटना चार दिवसापूर्वीची असून आता ती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. दरम्यान या प्रकाराबाबत कुडाळातील नागरिकांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे. यात संबंधित शिक्षक अशाच प्रकारे मारहाण करतो, असे अनेक प्रकार यापुर्वी घडले आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. तसेच झालेल्या प्रकारानंतर आपण अडचणीत येवू नये म्हणून त्या शिक्षकाने त्या विद्यार्थ्याच्या घरी जावून माफी मागितल्याची माहिती पुढे येत आहे. दरम्यान हे प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न झाला असला तरी व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे या प्रकारामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून अशा प्रकारे क्रुरतेने वागणार्‍या शिक्षकावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जिल्हावासीयांकडून होत आहे.

*संवाद मीडिया*

*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*

*💎एस.पी.बोअरवेल💎*

*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*

💁‍♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*

*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*

*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*

*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*

*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*

*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा