You are currently viewing न्याय मिळे पर्यंत संघर्ष सुरूच राहणार : राहुल गांधी

न्याय मिळे पर्यंत संघर्ष सुरूच राहणार : राहुल गांधी

हाथरस :

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि पक्षाच्या महासचिव प्रियांका गांधी वाढेरा अखेर शनिवारी सायंकाळी ७.२५ मिनिटांच्या दरम्यान उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये दाखल झाल्या. कथित सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित मुलीच्या घरी जाऊन त्यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांच्यासोबत के. सी. वेणुगोपाल, गुलाम नबी आझाद, पी. एल. पुनिया उपस्थित होते. एका बंद खोलीत राहुल-प्रियांका यांनी पीडित कुटुंबीयांशी बातचीत करताना त्यांचं दु:ख जाणून घेतले. यावेळी प्रियंका यांनी पीडितेच्या आईला घट्ट मिठी मारत न्याय मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला.

तत्पूर्वी शनिवारी दिल्लीहून हाथरसकडे निघालेल्या राहुल-प्रियका गांधी यांना दिल्ली-नोएडा डायरेक्ट फ्लायओव्हर (डीएनडी) वर अडवण्यात आले. काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिस यांच्यात बाचाबाची आणि लाठीचार्जचा प्रकार घडल्यानंतर प्रियांका-राहुल गांधी यांच्यासह केवळ पाच जणांना हाथरसकडे जाण्यासाठी परवानगी देण्यात आली. त्यामुळे काँग्रेसच्या अन्य नेत्यांसोबत मल्लिकार्जुन खडगे आणि रणदीप सुरजेवाला यांना माघारी फिरावे लागले. प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेस नेते पी. एल. पुनिया, गुलाम नबी आझाद, प्रमोद तिवारी हेदेखील हाथरसमध्ये पोहोचल. या दरम्यान, हाथरसमध्ये मोठ्या संख्येनं मीडिया कर्मचारी आणि पत्रकार उपस्थित होते. प्राथमिक माहितीनुसार जवळपास २००० हून अधिक लोक येथे जमले होते. सुरक्षेसाठी पोलिस अधिकारीही हाथरसमध्ये तैनात आहेत.पीडित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार, असे प्रियंका गांधी वढेरा म्हणाल्या. कुटुंबाला त्यांच्या मुलीला अखेरचे पाहताही आले नाही. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव असायला हवी, असेही त्या म्हणाल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen + nineteen =