You are currently viewing मिलाग्रीसच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत मारली बाजी.

मिलाग्रीसच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत मारली बाजी.

मिलाग्रीसच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत मारली बाजी.

सावंतवाडी

मिलाग्रीसची क्रीडा क्षेत्रातील घोडदौड अविरत सुरूच आहे. नुकत्याच पार पडलेल्या तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेमध्ये मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी या प्रशालेच्या १४ वर्षांखालील मुलांच्या संघाने अजिंक्यपद पटकावले. या संघाने आता जिल्हास्तरावर आपले नामांकन पक्के केले आहे.
विजेत्या संघाचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या क्रीडा शिक्षिका शेरॉन अल्फान्सो यांचे प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांनी अभिनंदन केले. यावेळी प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सिस्टर मेबल, पर्यवेक्षिका सौ.मेघना राऊळ तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा