You are currently viewing वास्तव आणि अनुभवातून साकारलेली साहित्यकृती श्रेष्ठ!” – राजन लाखे

वास्तव आणि अनुभवातून साकारलेली साहित्यकृती श्रेष्ठ!” – राजन लाखे

*”वास्तव आणि अनुभवातून साकारलेली साहित्यकृती श्रेष्ठ!” – राजन लाखे*

पिंपरी

“वास्तव आणि अनुभवातून साकारलेली साहित्यकृती श्रेष्ठ ठरते!” असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखाध्यक्ष राजन लाखे यांनी ऑटो क्लस्टर सभागृह, मुंबई – पुणे हमरस्ता, चिंचवड येथे केले. नाटककार नितीन सुतार लिखित ‘विधिलिखित’ या कादंबरीचे प्रकाशन करताना राजन लाखे बोलत होते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, मुंबई येथील संत निरंकारी मंडळाचे स. वि. लव्हटे, उद्योजक सूर्यकांत खंडागळे – पाटील, अभिनेते सिद्धार्थ झाडबुके आदी मान्यवरांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

राजन लाखे पुढे म्हणाले की, “नितीन सुतार लिखित ‘विधिलिखित’ या कादंबरीत वास्तव आणि अनुभव यांचा सुरेख समन्वय साधला असून तिच्या वाचनातून माणसाला स्वतःचा नव्याने शोध लागतो. त्यामुळे सर्वसामान्य वाचकांनीही आवर्जून वाचावी अशी ही साहित्यकृती आहे!” भाऊसाहेब भोईर यांनी, “नितीन सुतार यांनी साहित्य क्षेत्र आणि रंगभूमीसाठी दिलेले योगदान कौतुकास्पद आहे!” असे मत मांडले. स. वि. लव्हटे यांनी पुस्तकाचे अंतरंग विशद केले. लेखक नितीन सुतार यांनी आपल्या मनोगतातून, “जीवनात काहीतरी आक्रीत घडले की, माणूस हमखास त्याला ‘विधिलिखित’ असे संबोधतो; पण चांगली गोष्ट घडणे हेदेखील विधिलिखितच असते, अशी सकारात्मकता जनमानसात रुजावी म्हणूनच या कादंबरीचे लेखन केले आहे!” अशी भावना व्यक्त केली.

अपूर्व कला फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी संयोजनात परिश्रम घेतले. सुकन्या सुतार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा